Honda जबरदस्त Electric Scooter आणण्याच्या तयारीत; उत्तम रेंज, ड्युअल बॅटरीसह मिळणार भन्नाट फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:10 AM2021-06-21T11:10:33+5:302021-06-21T11:12:30+5:30

Electric Vehicle : सध्या अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रीक बाईक्स, स्कूटर आणण्याची करत आहेत तयारी. Honda कंपनीदेखील नवी स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत.

honda benly e electric scooter possibly to launch soon spotted testing know more features and range | Honda जबरदस्त Electric Scooter आणण्याच्या तयारीत; उत्तम रेंज, ड्युअल बॅटरीसह मिळणार भन्नाट फीचर्स

Honda जबरदस्त Electric Scooter आणण्याच्या तयारीत; उत्तम रेंज, ड्युअल बॅटरीसह मिळणार भन्नाट फीचर्स

Next
ठळक मुद्देसध्या अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रीक बाईक्स, स्कूटर आणण्याची करत आहेत तयारी.Honda कंपनीदेखील नवी स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत.

Honda Electric Bike : इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकांचा कल आता इलेक्ट्रीक वाहनांकडे वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. ग्राहकांची वाढती आवड पाहता वाहन उत्पादक कंपन्याया सेगमेंटमध्ये नवी मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच दिग्गज वाहन उत्पादक कंपनी Honda ची इलेक्ट्रीक स्कूटर Benly-E ची चाचणी सुरू असल्याचं दिसून आलं होतं.

गेल्या वर्षी २०१९ मध्ये Honda नं आपली Benly-E या इलेक्ट्रीक स्कूटरच्या सीरिजला पहिल्यांदा बाजारात सादर केलं होतं. या सीरिजमध्ये एकूण चार मॉडेल्स आहेत. आता या स्कूटरचं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारा टेस्टिंग सुरू असल्याचं दिसून आलं आहे. या सीरिजच्या सर्व स्कूटर्समध्ये निरनिराळे फीचर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. टेस्टिंग दरम्यान ही स्कूटर दिसल्यानं आता याच्या लाँचच्या बाबतीतही चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु सध्या कंपनीद्वारे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

टेस्टिंग मॉडेलमध्ये कंपनीनं LED हेडलँप डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि अॅक्सेसरीज पॉवर सॉकेट दिलं आहे. या स्कूटरच्या पुढील बाजूला मोठं बास्केट आणि मागील बाजूला कॅरिअरही देण्यात आलं आहे. यावर सर्वाधिक ६० किलोपर्यंतचं वजन ठेवता येऊ शकतं. सध्या ही स्कूटर केवळ सिंगल कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे आणि यात रिव्हर्स असिस्ट फंक्शनसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

काय असतील फीचर्स?
Benly E इलेक्ट्रीक स्कूटरच्या पुढील बाजूला १२ इंचाचा आणि मागील बाजूला १० इंचाचं टायर देण्यात आलं आहे. या स्कूटरचं एकूण वजन १२५ ते १३० किलोग्रामच्या दरम्यान आहे. यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. या स्कूटरचा खासगी तसंच व्यावसायिक पद्धतीनंही वापर करता येऊ शकतो.

कंपनी आपली ही इलेक्ट्रीक स्कूटर दोन निरनिराळ्या पर्यायांसोबत सादर करत आहेत. याच्या Benly e I आणि Pro I मध्ये २.८kW क्षमतेच्या मोटरचा वापर करण्यात आला आहे, जी १३एनएमचा टॉर्क जनरेट करते. ३० किलोमीटर प्रति तास या वेगानं स्कूटर चालवल्यास एका चार्जमध्ये ती ८७ किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे Benly e II आणि Pro II मध्ये ४.२kW क्षमतेच्या इलेक्ट्रीक मोटरचा वापर करण्यात आला आहे. ६० किलोमीटर प्रति तास वेगानं स्कूटर चालवल्यास ती ४३ किलोमीटरची रेंज देऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच यामध्ये ४८V क्षमतेच्या दोन रिमुव्हेबल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.   

Web Title: honda benly e electric scooter possibly to launch soon spotted testing know more features and range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app