हिरोचा धमाका! अवघ्या ३ मिनिटांत रिक्षाची होणार स्कूटर; सरकारचीही मिळाली परवानगी; जाणून घ्या 'खासियत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:13 IST2026-03-31T14:12:51+5:302026-03-31T14:13:17+5:30

या नाविन्यपूर्ण संकल्पनेची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही सोशल मीडियावरून या कल्पकतेचे कौतुक केले...

Hero's explosion Scooter will be converted from rickshaw in just 3 minutes Government also gave permission; Know the special features | हिरोचा धमाका! अवघ्या ३ मिनिटांत रिक्षाची होणार स्कूटर; सरकारचीही मिळाली परवानगी; जाणून घ्या 'खासियत'

हिरोचा धमाका! अवघ्या ३ मिनिटांत रिक्षाची होणार स्कूटर; सरकारचीही मिळाली परवानगी; जाणून घ्या 'खासियत'

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच आता 'हिरो मोटोकॉर्प'ने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून 'Hero Surge S32' नावाचे देशातील पहिले '२-इन-१' इलेक्ट्रिक वाहन सादर केले आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे गरजेनुसार याचे रूपांतर रिक्षातून स्कूटरमध्ये आणि स्कूटरमधून रिक्षामध्ये अवघ्या काही मिनिटांत करता येते. या नाविन्यपूर्ण संकल्पनेची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही सोशल मीडियावरून या कल्पकतेचे कौतुक केले.

आता प्रवास आणि कमाई एकाच वाहनाने - 
महत्वाचे म्हणजे, Hero Surge S32 चे रुपांतर थ्री-व्हीलरमधून स्कूटरमध्ये करण्यासाठी अवघे ३ मिनिटे लागतात. यासाठी एक विशेष मॉड्यूल देण्यात आले आहे, जे जोडून वाहनाचा आकार बदलता येतो. विशेष म्हणजे, टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर या दोन्ही मॉड्ससाठी स्वतंत्र मोटर आणि बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे आता एकाच वाहनाचा वापर व्यावसायिक कामासाठी आणि वैयक्तिक प्रवासासाठीही करणे शख्य होईल.

५०० किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता -
हे वाहन प्रामुख्याने छोटे व्यावसायिक आणि डिलिव्हरी क्षेत्रातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. थ्री-व्हीलर मोडमध्ये हे वाहन ५०० किलोपर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते. याशिवाय हे वाहन स्कूटर म्हणूनही वापरता येते. आधुनिक फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, यात एलईडी लाईट्स, डिजिटल डिस्प्ले आणि काही प्रगत सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे हे वाहन प्रदूषणमुक्त असून पर्यावरणासाठी पूरक आहे. कंपनी लवकरच हे स्मार्ट वाहन भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Web Title : हीरो का इलेक्ट्रिक धमाका: 3 मिनट में रिक्शा बनेगा स्कूटर!

Web Summary : हीरो मोटोकॉर्प ने पेश किया सर्ज एस32, 2-इन-1 इलेक्ट्रिक वाहन, जो मिनटों में रिक्शा से स्कूटर में बदल जाता है। गडकरी ने इस नवाचार की सराहना की। वाहन में दोनों मोड के लिए अलग मोटर और बैटरी हैं। यह व्यवसाय और व्यक्तिगत उपयोग के लिए आदर्श है, 500 किलो तक वजन ले जा सकता है। जल्द लॉन्च होगा।

Web Title : Hero's Electric Vehicle Revolution: Rickshaw to Scooter in 3 Minutes!

Web Summary : Hero MotoCorp introduces Surge S32, a 2-in-1 electric vehicle, transforming from rickshaw to scooter in minutes. Gadkari praises this innovation. This vehicle has separate motors and batteries for both modes. It's ideal for business and personal use, carrying up to 500 kg. Launch imminent.