हिरोने नवीन Splendor केली लाँच, मायलेज 70kmpl, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 08:52 PM2023-03-06T20:52:52+5:302023-03-06T20:53:22+5:30

Hero Super Splendor XTEC launched : आतापर्यंत हिरो आपल्या 100cc बाईक फक्त XTEC व्हेरिएंटमध्ये विकत होती. 

Hero Super Splendor XTEC launched at Rs 83,368 | हिरोने नवीन Splendor केली लाँच, मायलेज 70kmpl, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

हिरोने नवीन Splendor केली लाँच, मायलेज 70kmpl, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

googlenewsNext

नवी दिल्ली : दिग्गज दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पसाठी (Hero MotoCorp)  हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) ही सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. कंपनी बाईकमध्ये सतत अपग्रेड करत राहते. कंपनी बाईक वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये विकते. आतापर्यंत हिरो आपल्या 100cc बाईक फक्त XTEC व्हेरिएंटमध्ये विकत होती. 

हिरोने आता XTEC व्हर्जनमध्ये 125cc असलेली सुपर स्प्लेंडर देखील लाँच केली आहे. हिरो सुपर स्प्लेंडर XTEC ला पॅशन XTEC च्या वर आहे. कंपनीने सुपर स्प्लेंडर XTEC ची ड्रम ब्रेक व्हेरिएंटसाठी किंमत 83,368 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटसाठी 87,268 रुपये  (दोन्ही किंमती एक्स-शोरूम) ठेवली आहे.

इंजिन आणि मायलेज
यापूर्वी बाईक डीलर्सकडे दिसली होती. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये 124.7 cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7500 RPM वर 10.7 bhp पॉवर आणि 6000 RPM वर 10.6 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, सुपर स्प्लेंडर 68 किमी/लीटरचे फ्यूल इकॉनॉमी ऑफर करेल.

फीचर्स
हिरो मोटोकॉर्पने आपल्या सुपर स्प्लेंडरसह 'सुपर' पॉवर, मायलेज, आराम आणि स्टाइलचा वादा केला आहे. आता या बाईकमध्ये फुली-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारख्या फीचर्ससह कनेक्टिव्हिटी फीचर्स जोडण्यात आली आहेत. यामध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, लो फ्यूल वॉर्निंग, सर्व्हिस रिमाइंडर, मालफंक्शन इंडिकेटर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. XTEC सूटसह कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये ब्लूटूथ पेअरिंग, कॉल अॅलर्ट आणि एसएमएस अलर्ट इत्यादींचा समावेश आहे.

डिझाइन
हिरो स्प्लेंडर 125cc XTEC मध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी पोझिशन लॅम्प आणि आकर्षक ग्राफिक्स आहेत. बाईकच्या फ्रंटमध्ये एक ऑप्शनल डिक्स ब्रेक, रिअर ड्रम ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ट्विन शॉक ऍब्जॉर्बर्स, अलॉय व्हील्स ब्लॅक फिनिश, रायडर ट्रँगल यांचा समावेश आहे. तसेच, हिरो कंपनीची ही बाईक बाजारात होंडा कंपनीच्या सीबी शाइन 125 cc आणि टीव्हीएस रेडरसोबत स्पर्धा करते.

Web Title: Hero Super Splendor XTEC launched at Rs 83,368

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.