Hero ने ग्राहकांना दिला मोठा झटका! 1 एप्रिलपासून सर्व गाड्यांच्या किमती वाढणार, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 19:15 IST2023-03-22T19:15:04+5:302023-03-22T19:15:48+5:30
देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने एप्रिल महिन्यापासून त्यांच्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Hero ने ग्राहकांना दिला मोठा झटका! 1 एप्रिलपासून सर्व गाड्यांच्या किमती वाढणार, जाणून घ्या कारण...
Hero MotoCorp: देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने एप्रिल महिन्यापासून त्यांच्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून वाहनांच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. वाहनांच्या किमतीत किती वाढ होणार हे वेगवेगळ्या मॉडेल्सवर अवलंबून असेल.
कंपनीने एका निवेदनात म्हटले की, 1 एप्रिल 2023 पासून आपल्या निवडक मोटारसायकली आणि स्कूटरच्या एक्स-शोरुम किमतीत वाढ होणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. वाहनांच्या किंमतीत सुमारे 2 टक्क्यांनी वाढ होईल, पण कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढेल याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
नवीन नियम...
1 एप्रिलपासून, वाहनांना रिअल-टाइम ड्रायव्हिंग उत्सर्जन पातळीचे परीक्षण करण्यासाठी ऑन-बोर्ड स्व-निदान उपकरण असणे आवश्यक आहे. उत्प्रेरक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सर यांसारख्या उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करण्यासाठी वाहनातून उत्सर्जनावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी हे उपकरण सतत निरीक्षण करेल. सध्या वाहन उत्पादक त्यांची वाहने BS6 फेज-II साठी तयार करत आहेत, ज्याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून होणार आहे.
या अंतर्गत कार्बन डायऑक्साइड (CO2), कार्बन मोनोऑक्साइड (CO), हायड्रोकार्बन्स आणि वाहनांमधून उत्सर्जित होणारे नायट्रोजनचे ऑक्साईड यांसारख्या विशिष्ट वायूंच्या उत्सर्जनाचे परीक्षण केले जाईल. उत्सर्जन मानदंडांवर आधारित भारत स्टेज मानक प्रथम 2000 साली लाँच करण्यात आले. आतापर्यंत बाजारात BS6 वाहनांच्या विक्रीला परवानगी होती, आता उत्सर्जन मानके आणखी कडक करून सरकार BS6 चा दुसरा टप्पा सुरू करणार आहे.