Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:03 IST2025-11-08T18:02:36+5:302025-11-08T18:03:22+5:30
Hero Xtreme 125R Launched: १.०४ लाख रुपयाच्या किंमतीसह हिरो एक्सट्रीम १२५आर ड्युअल-चॅनेल एबीएस भारतात लॉन्च झाली.

Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
दुचाकी क्षेत्रातील प्रमुख कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतीय ग्राहकांसाठी आपली स्पोर्टी कम्युटर बाईक हिरो एक्सट्रीम १२५ आरचा एक नवीन आणि अपडेट व्हेरिएंट बाजारात आणला आहे. आकर्षक फीचर्स आणि प्रगत तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या या मोटारसायकलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १.०४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन एक्सट्रीम १२५ आरच्या डिझाइनमध्ये फारसा बदल नसला तरी, टेक्नोलॉजी आणि फीचर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे ही बाईक सेगमेंटमध्ये अव्वल ठरते.
या बाईकमध्ये राइड-बाय-वायर थ्रॉटल समाविष्ट आहे. यामुळे क्रूझ कंट्रोल आणि मल्टीपल राइडिंग मोड्स (पॉवर, रोड आणि इको) वापरणे शक्य होते. एक्सट्रीम १२५ आर ही तिच्या सेगमेंटमधील पहिली मोटारसायकल बनली आहे, जी ड्युअल-चॅनल एबीएससह ड्युअल डिस्क ब्रेक्सची सुविधा देते.
नव्या रंगात बाजारात दाखल
ही सर्व फीचर्स ग्लॅमर एक्समध्ये आढळणाऱ्या सेगमेंटेड कलर एलसीडी डिस्प्लेद्वारे अॅक्सेस करता येतात. ही बाईक ब्लॅक पर्ल रेड, ब्लॅक मॅटशडो ग्रे आणि ब्लॅक लीफ ग्रीन या तीन रंगात लॉन्च करण्यात आली, जी बघताच ग्राहकांना आवडेल.
प्रतिस्पर्ध्यांचे टेन्शन वाढवले
हिरो एक्सट्रीम १२५ आरमध्ये १२४.७ सीसी सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ११.५ एचपी पॉवर आणि १०.५ एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. दरम्यान, १.०४ लाख रुपयांच्या किमतीसह हिरो एक्सट्रीम १२५ आर लाइनअपमध्ये सर्वात टॉपची बाईक आहे. या बाईकची स्पर्धा टीव्हीएस रेडर, होंडा सीबी१२५ हॉर्नेट, बजाज पल्सर एन१२५ यांसारख्या मॉडेल्सशी असेल. या बाईकची किंमत टॉप-स्पेक रेडरपेक्षा सुमारे ९,००० रुपये जास्त असली तरी, रेडरमध्ये ड्युअल-चॅनल एबीएस आणि राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी मिळत नाही.