Hero कंपनीची मोठी घोषणा; रस्त्याकडेच्या 20000 मेकॅनिकना EV दुरुस्तीचे ट्रेनिंग देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 07:40 PM2021-04-06T19:40:00+5:302021-04-06T19:40:22+5:30

Hero Electric to train roadside mechanics in India: अचानक बॅटरी संपली तर काय? प्रवास करताना इलेक्ट्रीक वाहनामध्ये बिघाड झाला तर काय करावे, सर्व्हिस सेंटर जवळ नसल्याने का घ्यावी अशा अनेक समस्या आहेत.

Hero Electric to train 20000 roadside mechanics to repair Electric Vehicles | Hero कंपनीची मोठी घोषणा; रस्त्याकडेच्या 20000 मेकॅनिकना EV दुरुस्तीचे ट्रेनिंग देणार

Hero कंपनीची मोठी घोषणा; रस्त्याकडेच्या 20000 मेकॅनिकना EV दुरुस्तीचे ट्रेनिंग देणार

Next

देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरोच्या इलेक्ट्रीक उपकंपनीने (Hero Electric) मोठी घोषणा केली आहे. ग्राहकांना इलेक्ट्रीक वाहनांसाठी विश्वास दिला तरच ते ही वाहने खरेदी करू शकणार आहेत. सध्या या ईलेक्ट्रीक वाहनांबाबत (Electric Vehicles) लोकांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज, प्रश्न आहेत. ते दूर करण्यासाठी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात इलेक्ट्रीक वाहने दुरुस्त करण्यासाठी रस्त्याकडेच्या मेकॅनिकना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. (The country's leading electric two-wheeler maker Hero Electric aims to train over 20,000 roadside mechanics across the country over the next three years.)

Electric Scooter: इलेक्ट्रीक टु व्हीलरच्या मार्गात या आहेत पाच मोठ्या अडचणी; दूर न केल्यास...


हीरो कंपनी थोडेथोडके नव्हे तर 20000 रस्त्याकडेच्या मेकॅनिकना इलेक्ट्रीक वाहने दुरुस्तीचे ट्रेनिंग देणार आहे. अचानक बॅटरी संपली तर काय? प्रवास करताना इलेक्ट्रीक वाहनामध्ये बिघाड झाला तर काय करावे, सर्व्हिस सेंटर जवळ नसल्याने का घ्यावी अशा अनेक समस्या आहेत. या साऱ्या समस्या दूर करण्यासाठी हीरो इलेक्ट्रीक पुढील तीन वर्षांत रस्त्या कडेला असलेल्या 20000 हून अधिक मेकॅनिकना इलेक्ट्रीक वाहनांच्या दुरुस्तीचे ट्रेनिंग देणार आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, यामुळे ग्राहकांना कोणत्याही चिंतेशिवाय इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यास मदत मिळणार आहे. 

Electric Vehicle: इलेक्ट्रीक कार, स्कूटर घेण्याची पाच महत्वाची कारणे; जाणून घ्या...


गुडगावच्या या कंपनीने गेल्या वर्षी 53,000 इलेक्ट्रीक दुचाकी विकल्या आहेत. याशिवाय कंपनीचा पुढील दोन वर्षांत 20000 चार्जिंग स्टेशन उघडण्याचा विचार आहे. कंपनीने आधीच 4000 मेकॅनिकना प्रशिक्षण दिले आहे. सोबतच कंपनीने 1500 हून अधिक चार्जिंग स्टेशन सुरु केली आहेत. 

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत 5 मोठे गैरसमज; जाणून घ्या MG Moters च्या ZS EV कडून...


हीरो इलेक्ट्रीकचे संचालक नवीन मुंजाल यांनी पीटीआयला सांगितले की, देशात इलेक्ट्रीक वाहन क्षेत्र वेगाने वाढत आहे. कंपनीचे ६०० डीलर आणि सब डीलर आहेत. सध्या रस्त्याकडेला ४००० हून अधिक मेकॅनिक प्रशिक्षित केले आहेत. २०२३ किंवा २४ पर्यंत यामध्ये आणखी १६००० ची भर पडेल असे ते म्हणाले. 

कारचे अ‍ॅव्हरेज कमी झालेय का? या ट्रिक फॉलो करा, 10 टक्के जास्त मिळवा...

Web Title: Hero Electric to train 20000 roadside mechanics to repair Electric Vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.