Hero Electric उभारणार 20,000 चार्जिंग स्टेशन, अ‍ॅपवरून सर्च करता येणार लोकेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:21 PM2021-09-25T16:21:28+5:302021-09-25T16:24:38+5:30

Hero Electric : हिरो इलेक्ट्रिकने देशभरात सुरूवातीला 10,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन (10,000 EV Charging Stations) उभारण्यासाठी दिल्लीस्थित स्टार्टअप कंपनी मॅसिव्ह मोबिलिटीसोबत (Massive Mobility) भागीदारी केली आहे.

hero electric to set up 20000 ev charging stations across india location can find through app | Hero Electric उभारणार 20,000 चार्जिंग स्टेशन, अ‍ॅपवरून सर्च करता येणार लोकेशन!

Hero Electric उभारणार 20,000 चार्जिंग स्टेशन, अ‍ॅपवरून सर्च करता येणार लोकेशन!

Next

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक असलेली हीरो इलेक्ट्रिक (Hero Electric) आता चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देत आहे. देशभरात 20,000 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हिरो इलेक्ट्रिकने देशभरात सुरूवातीला 10,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन (10,000 EV Charging Stations) उभारण्यासाठी दिल्लीस्थित स्टार्टअप कंपनी मॅसिव्ह मोबिलिटीसोबत (Massive Mobility) भागीदारी केली आहे. (hero electric to set up 20000 ev charging stations across india location can find through app)

2022 च्या अखेरपर्यंत 20,000 चार्जिंग स्टेशन
ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या या संपूर्ण नेटवर्कचा वापर सर्व इलेक्ट्रिक वाहन कंपन्या करू शकतीत. यामुळे उत्पादकांमध्ये एक मानक स्थान निर्माण करण्यात मदत मिळेल. या संदर्भात हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले की, भारत सरकारने अलीकडेच अनेक घोषणा करून इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) मार्केटचा विस्तार केला आहे. हिरो इलेक्ट्रिक परवडणारी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी गुंतवणूक करत आहे.

याचबरोबर, 'आतापर्यंत कंपनीने 1650 चार्जिंग स्टेशन बसवले आहेत. 2022 च्या अखेरीस 20,000 चार्जिंग स्टेशन बसवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना कोणत्या प्रकारचे चार्जिंग स्टेशन हवे आहेत, यासाठी कंपनीने एक सर्वेक्षणही केले. यामध्ये असे आढळून आले की ग्राहकांना इंटरनेट किंवा अॅप स्थानासह 16 एएमपीएस पॉवर, लाँग चार्जिंग कॉर्ड आणि स्मार्ट चार्जिंग स्टेशन आवश्यक आहे, असे सोहिंदर गिल यांनी सांगितले.

अ‍ॅपवरून लोकेशन सर्च करता येणार
मॅसिव्ह मोबिलिटी इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकींसाठी चार्जिंग स्टेशनचे क्लाउड-आधारित नेटवर्क तयार करण्याचे काम करत आहे. हे नेटवर्क पार्किंग आणि चार्जिंग पॉइंट्सच्या मालकांना जोडेल, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील. हीरो इलेक्ट्रिकने देशभरात 20,000 चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. 

हे नेटवर्क तयार करण्यासाठी मेसिव्ह मोबिलिटी एक मोबाईल अ‍ॅप मॅसिव्ह चार्जिंग विकसित करत आहे. या अ‍ॅपवर, युजर्स त्यांचे प्रोफाइल तयार करू शकतील आणि चार्जिंग स्टेशनवरील वाय-फाय सुविधा सुलभ पेमेंट, ओळख किंवा चार्जिंग पॉईंटचे लोकेशन इत्यादींची माहिती मिळवण्यास मदत होईल.

Read in English

Web Title: hero electric to set up 20000 ev charging stations across india location can find through app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app