शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आता FASTag ची गरज नाही? लवकरच सुरु होणार GNSS सिस्टम, टोल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:59 IST

GNSS Toll System : सरकार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) टेक्नॉलॉजी आणण्याच्या तयारीत आहे.

Global Navigation Satellite System : भारतातील ऑटो इंडस्ट्रीमध्ये सतत काहीतरी नवीन अपडेट्स होताना दिसून येत आहे. यासोबतच टोलवसुलीतही वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत, टोल वसुलीसाठी पारंपारिक पद्धतीचा वापर केला जात होता. त्यानंतर  FASTag ची सुविधा आणली. 

मात्र, आता सरकार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) टेक्नॉलॉजी आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमची घोषणा केली होती. ही सिस्टम सध्या टेस्टिंगच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. ही सिस्टम आल्यानंतर भारतात जुनी टोल सिस्टम रद्द केली जाऊ शकते.

काय आहे GNSS?GNSS नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमवर आधारित असणार आहे. यात सॅटेलाइट आधारित युनिट असेल, जे वाहनांमध्ये बसवले जाईल. या सिस्टमच्या मदतीने अधिकाऱ्यांना सहजपणे ट्रॅक करता येईल की, कारने कधीपासून टोल महामार्गाचा वापर करायला सुरुवात केली आहे. कार टोल रस्त्यावरून निघताच, सिस्टम टोल रस्त्याच्या वापर कॅलक्युलेट करेल आणि आपल्या रक्कमेतून टोल वजा करेल.

GNSS सिस्टमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सिस्टमच्या मदतीने प्रवासी फक्त तेवढेच पैसे देईल, जेवढा त्यांनी महामार्गाचा वापर केला आहे. तसेच, या सिस्टममुळे प्रवाशांना किती टोल भरावा लागणार आहे, हे देखील कळू शकेल आणि त्यानुसार ते भरू शकतील. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ही सिस्टम आल्यानंतर पारंपारिक टोलनाकेही काढून टाकले जातील, जिथे कधी-कधी लांबच लांब रांगा लागत होत्या.

कधीपर्यंत नवीन सिस्टम येईल?सध्या सरकारने याबाबतची तारीख जाहीर केलेली नाही, मात्र देशातील दोन प्रमुख महामार्गांवर या सिस्टमची टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील बंगळुरू-म्हैसूर राष्ट्रीय महामार्ग (NH-257) आणि हरयाणातील पानिपत-हिसार राष्ट्रीय महामार्ग (NH-709) यांचा समावेश आहे. सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच टप्प्याटप्प्यानं या सिस्टमची अंमलबजावणी केली जाईल.

टॅग्स :Fastagफास्टॅगAutomobileवाहनtollplazaटोलनाकाcarकारtechnologyतंत्रज्ञान