फुल फॅमिली...! महिंद्राची सात सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच; २० लाखांच्या आत, रिअल रेंज ५०० Km!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:15 IST2025-11-27T14:15:13+5:302025-11-27T14:15:52+5:30
इंग्लो या खास इलेक्ट्रीकसाठी बनविलेल्या प्लॅटफॉर्मवर ही कार तयार झालेली आहे. एका चार्जमध्ये जवळपास ५०० किमीची रेंज देत असल्याचा दावा महिंद्राने केला आहे.

फुल फॅमिली...! महिंद्राची सात सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच; २० लाखांच्या आत, रिअल रेंज ५०० Km!
इलेक्ट्रीक वाहन बाजारात महिंद्राने आता सात सीटर कार आणत खळबळ उडवून दिली आहे. XEV 9S ही कार भारतीय बाजारात किमी किंमतीत लाँच केली आहे. इंग्लो या खास इलेक्ट्रीकसाठी बनविलेल्या प्लॅटफॉर्मवर ही कार तयार झालेली आहे. एका चार्जमध्ये जवळपास ५०० किमीची रेंज देत असल्याचा दावा महिंद्राने केला आहे.
महिंद्रा XEV 9S एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत १९ लाख ९५ हजार रुपयांपासून सुरू होते. ही एसयूव्ही ५९ kWh, ७० kWh आणि ७९ kWh अशा तीन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ५०० किमीची रेंज ही कंपनीने रिअल वर्ल्ड़ रेंज सांगितलेली आहे.
या कारमध्ये १८० किलोवॉटची पॉवर आणि ३८० न्यूटन मीटरचा पीक टॉर्क निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. ही एसयूव्ही अवघ्या ७ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि तिचा कमाल वेग २०२ किमी प्रतितास आहे.
XEV 9S च्या केबिनमध्ये १२.३ इंचाचे तीन मोठे स्क्रीन देण्यात आले आहेत. एक इन्फोटेनमेंटसाठी, एक ड्रायव्हर डिस्प्लेसाठी आणि तिसरा खास प्रवाशांच्या मनोरंजनासाठी डिस्प्ले देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यामध्ये ७ एअरबॅग्ज आणि लेव्हल २ ADAS देण्यात आले आहे. १६ स्पीकरचे हार्मन कार्डन ऑडिओ सिस्टीम, डॉल्बी ॲटमॉस, ५G कनेक्टिव्हिटी, व्हेंटिलेटेड सीट्स (पुढच्या आणि दुसऱ्या रांगेत), ॲम्बिएंट लाईट्स आणि ऑगमेंटेड रिॲलिटी हेड-अप डिस्प्ले यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत. यामध्ये ५२७ लिटर बूट स्पेस आणि समोरच्या बाजूला १५० लिटरचा अतिरिक्त स्टोरेज देखील मिळतो.
बुकिंग आणि डिलिव्हरी
महिंद्रा XEV 9S ची बुकिंग पुढील वर्षी १४ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे, तर डिलिव्हरी २३ जानेवारी २०२६ पासून ग्राहकांना मिळणे अपेक्षित आहे. ही एसयूव्ही केवळ १.२ रुपये प्रति किलोमीटर इतक्या कमी खर्चात धावते, ज्यामुळे ती कुटुंबांसाठी एक किफायतशीर आणि भविष्यवेधी पर्याय ठरू शकते.