Wagon R पासून Creta पर्यंत...; आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दिसणार या 12 कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 05:17 PM2023-11-07T17:17:46+5:302023-11-07T17:18:58+5:30

आता येणाऱ्या काही वर्षांतच अनेक पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक व्हर्जनही लॉन्च होणार आहेत.

From Wagon R to Creta Now these 12 cars will be seen in electric version in india | Wagon R पासून Creta पर्यंत...; आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दिसणार या 12 कार!

Wagon R पासून Creta पर्यंत...; आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दिसणार या 12 कार!

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे कंपन्यादेखील आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलियोचा विस्तार करत आहेत. आता येणाऱ्या काही वर्षांतच अनेक पेट्रोल आणि डिझेल कारचे इलेक्ट्रिक व्हर्जनही लॉन्च होणार आहेत. तर जाणून घेऊयात अशाच खास 12 कारसंदर्भात.

- महिंद्र थार, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि महिंद्रा XUV700 -
या कार पुढील दोन ते तीन महिन्यात बाजारात येतील, अशी आशा आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडिफाइड INGLO-P1 डेडिकेटेड EV प्लॅटफॉर्मवर बेस्ड असतील

टाटा हॅरियर, टाटा सफारी आणि टाटा पंच -
टाटा मोटर्स या वर्षाच्या अखेरपर्यंत पंच ईव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यानंतर पुढील दोन वर्षांत हॅरियर ईव्ही आणि सफारी ईव्ही लॉन्च केली जाईल.

ह्युंदाई क्रेटा आणि ह्युंदाई एक्सटर -
क्रेटा ईव्ही 2025 च्या सुरुवातीला बाजारात येणे अपेक्षित आहे. तसेच, ह्युंदाई एक्सटर ईव्ही आगामी टाटा पंच ईव्हीला टक्कर देण्यासाठी आणण्याची शक्यता आहे.

होंडा एलिव्हेट -
होंडा कार्स इंडियाने एलिव्हेटचे हायब्रिड व्हर्जन लॉन्च न करता, हिचे थेट ईव्ही व्हर्जन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार पुढील तीन वर्षांत बाजारात येऊ शते.

मारुती सुझुकी वॅगनआर आणि मारुती सुझुकी जिम्नी -
आर्थिक वर्ष 2030 पर्यंत 6 नवे ईव्ही मॉडेल बाजारात उतरवण्याची मारुती सुझुकीची योजना आहे. यात जिम्नी आणि वॅगनआरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनचाही  समावेश आहे.

रेनॉल्ट क्विड -
रेनॉल्ट क्विड ईव्ही आधीपासूनच काही निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये डेसिया स्प्रिंग ईव्ही म्हणून उपलब्ध आहे. ही कार 2024 च्या अखेरपर्यंत अथवा 2025 च्या सुरुवातीपर्यंत भारतातील रस्त्यावरून दावेल अशी आशा आहे.
 

Web Title: From Wagon R to Creta Now these 12 cars will be seen in electric version in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.