Formula E 2025 Race: जगातील सर्वात अत्याधुनिक इलेक्ट्रिक रेसिंग चॅम्पियनशिप Formula E पुन्हा एकदा रोमांचक स्पर्धा घेऊन ट्रॅकवर परतत आहे. उद्या, म्हणजे 6 डिसेंबरपासून ब्राझीलमधील साओ पाउलो येथे E-Prix वीकेंडची सुरुवात होणार आहे. जगभरातील मोटरस्पोर्ट चाहत्यांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. या वर्षीची रेस भारतीय ऑटो उद्योगासाठीही विशेष ठरणार आहे, कारण या ग्लोबल रेसमध्ये महिंद्रा रेसिंग पुन्हा एकदा आपल्या दमदार उपस्थितीची छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारताची ग्लोबल एंट्री
2013 पासून फॉर्म्युला ईमध्ये सक्रिय असलेली महिंद्रा रेसिंग यंदा आणखी दमदार परफॉर्मन्ससह उतरत आहे. टीममध्ये खालील दोन अनुभवी ड्रायव्हर्सचा समावेश करण्यात आला आहे.
निक डी व्रीझ (Nyck de Vries) - फॉर्म्युला ई सीझन 7 चे वर्ल्ड चॅम्पियन. तांत्रिक समज, नियंत्रित ड्रायव्हिंग आणि दबावात शांत राहण्याची क्षमता यासाठी प्रसिद्ध.
एडोआर्दो मोर्टारा (Edoardo Mortara) - फॉर्म्युला ई मधील अनेक विजयांचे अनुभवी चालक. आक्रमक रेसिंग स्टाइल आणि जलद रणनीतिक निर्णयासाठी ओळखले जातात.
महिंद्राला या दोन्ही ड्रायव्हर्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
इतर टॉप दावेदारांवरही नजर
विद्यमान चॅम्पियन ओलिव्हर रोवलंड पुन्हा एकदा आपला किताब बचावासाठी रेसमध्ये उतरेल. त्याचबरोबर एंड्रेटी टीमचा नवा ड्रायव्हर फेलिपे ड्रुगोविच डेब्यूपूर्वीच चर्चेत आहे. ही रेस विशेष ठरण्याचे आणखी एक कारण म्हणजे, साओ पाउलोचा स्ट्रीट सर्किट हा लुकास दी ग्रासी आणि ड्रुगोविच दोघांचाही ‘होम ट्रॅक’ आहे.
रेस शेड्यूल (भारतीय वेळेनुसार)
5 डिसेंबर (शुक्रवार)
FP1 – रात्री 1:00
6 डिसेंबर (शनिवार)
FP2 – संध्याकाळी 4:00
क्वालिफायिंग – संध्याकाळी 6:10
फायनल रेस – रात्री 10:35
भारतामध्ये रेस कुठे पाहता येईल?
भारतीय प्रेक्षक Sony LIV आणि Sony Sports Network वरुन सर्व लाइव्ह अॅक्शन पाहू शकतात. फाइनल रेस शनिवार रात्री 10 वाजता प्रसारित होईल.
साओ पाउलो स्ट्रीट सर्किटची वैशिष्ट्ये
2.933 किमी लांबीच्या या ट्रॅकवरील 11 टर्न्स, लांब स्ट्रेट्स, टाइट राइट-हॅंडर्स आणि टेक्निकल चिकेन्स ड्रायव्हर्सची परीक्षा घेतात. ओव्हरटेकिंगच्या भरपूर संधींसह एनर्जी मॅनेजमेंट हा रेसचा महत्त्वाचा भाग ठरतो.
Web Summary : Formula E 2025 starts in Sao Paulo. Mahindra Racing competes with drivers Nyck de Vries and Edoardo Mortara. Champion Oliver Rowland returns. The race will be broadcast live on Sony LIV and Sony Sports Network.
Web Summary : फॉर्मूला ई 2025 साओ पाउलो में शुरू। महिंद्रा रेसिंग ड्राइवर निक डी व्रीज़ और एडोआर्डो मोर्टारा के साथ प्रतिस्पर्धा कर रही है। चैंपियन ओलिवर रोलैंड वापसी करेंगे। रेस का सीधा प्रसारण सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क पर किया जाएगा।