शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Ford India Job Cut: टाटाने मदतीचा हात दिला, तरीही फोर्ड इंडिया कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:20 AM

Ford India Job Cut: कंपनी सध्या टेस्ला सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सॉफ्टवेअरवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यामागे लागली आहे. यामुळे कंपनीला जुन्या कर्मचाऱ्यांची गरज राहिलेली नाही. 

अमेरिकेची बडी ऑटोमोबाईल कंपनी मेटाकुटीला आली आहे. गेल्याच वर्षी कंपनीने भारतातून काढता पाय घेत कर्मचारी आणि कार घेतलेल्या ग्राहकांना धक्का दिला होता. आधीच बदनाम असलेली कंपनी आणखीनच बदनाम झाली आहे. असे असताना फोर्डचा सानंदमधील एक प्लांट विकत घेऊन टाटाने मदत केली. तरी देखील कंपनी फोर्ड इंडियातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. 

फोर्ड मोटर भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील एकूण ३००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार आहे. कंपनी सध्या टेस्ला सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सॉफ्टवेअरवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यामागे लागली आहे. यामुळे कंपनीला जुन्या कर्मचाऱ्यांची गरज राहिलेली नाही. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, काढून टाकण्यात येणाऱ्यांपैकी सुमारे 2,000 कर्मचारी हे कंपनीच्या पेरोलवर आहेत. तर उर्वरित १००० कर्मचारी हे कंत्राटी आहेत. फार्ले आणि फोर्डचे अध्यक्ष बिल फोर्ड यांनी कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. आम्ही काही नोकऱ्या कमी करत आहोत. फोर्डच्या व्यवसायाची पुनर्बांधणी केली जात आहे. तुम्ही याबाबत तुमच्या टीम लीडरसोबत चर्चा करू शकता, असे बिल फोर्ड यांनी म्हटले आहे. 

ऑटो उद्योग जेव्हा इलेक्ट्रीक वाहने आणि डिजिटल सर्विसकडे वळला तेव्हा कर्मचाऱ्यांकडे त्यासाठीचे कौशल्य नव्हते. जुन्या तंत्रज्ञानावर काम करणारे अनेकजण होते, असे फोर्डचे मुख्य कार्यकारी जिम फार्ली गेल्या काही महिन्यांपासून म्हणत होते. इलेक्ट्रिक वाहनांची एक मोठी लाइनअप विकसित करण्यासाठी फार्ले यांनी नवीन धोरण स्वीकारले आहे. टेस्लाप्रमाणेच, फोर्डला देखील डिजिटल सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असलेल्या या सेवांद्वारे अधिक महसूल मिळवायचा आहे.

फोर्डने 2023 पर्यंत 5 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याची घोषणा केली आहे. ईव्ही बनवण्यासाठी कंपनीने बॅटरीही विकसित केली आहे. कंपनीने वार्षिक 60 GWh क्षमतेच्या कंपनीशी करार केला आहे. 

टॅग्स :Fordफोर्डTataटाटा