मुंबई : भारतात आधीच 16 कंपन्यांच्या कार रस्त्यावर धावत असताना ब्रिटनच्या एका कंपनीने देशाच्या रस्त्यांवर पाऊल ठेवले आहे. MG (Morris Garages) Motor ने त्यांची Hector ही बहुप्रतिक्षित आणि इंटरनेट फिचरनी युक्त असलेली पहिली एसयुव्ही शोकेस केली आहे. मात्र, या कारची किंमत अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. येत्या जूनच्या सुरवातीला ही कंपनी कारची डिलिव्हरी सुरु करणार आहे.
भारतात आजच्या घडीला 16 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार कंपन्या आहेत. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. त्यातच यंदा आणखी दोन कंपन्या भारतीय बाजारात भुरळ घालण्यासाठी येत आहेत. यापैकी एक एमजी मोटर्स आहे. या कंपनीने तरुण वर्गाला भुरळ घालण्यासाठी Hector ही कार आणली आहे. आज मुंबईमध्ये ही कार दाखविण्यात आली.
एमजी मोटरने भारतातील 50 शहरांमध्ये 120 दालने उघडली आहेत. तसेच पुढील काही काळात हा आकडा 250 पार नेण्याचे सांगितले आहे.
भारतीय रस्त्यांवर आणण्यासाठी ही एसयुव्ही ब्रिटनच्या एसयुव्हीपेक्षा वेगळी बनविण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 300 बदल करण्यात आले आहेत.