कार असो किंवा बाईक... इंश्युरन्स काढला नाही तर बसेल मोठा भुर्दंड! पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:01 IST2025-01-27T11:58:14+5:302025-01-27T12:01:02+5:30
Car-Bike Insurance : तुमच्याकडे थर्ड-पार्टी इंश्युरन्स प्रूफ असेल, तरच तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल विकत घेता येईल.

कार असो किंवा बाईक... इंश्युरन्स काढला नाही तर बसेल मोठा भुर्दंड! पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही
Car-Bike Insurance : प्रत्येक वाहनांवर हल्ली इंश्युरन्स काढला आहे. जर तुम्हीही इंश्युरन्स काढला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन नियमांनुसार, तुमच्याकडे वाहनांसाठी वॅलिड थर्ड-पार्टी इंश्युरन्स असलाच पाहिजे. अन्यथा तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल सुद्धा मिळणार नाही. फक्त पेट्रोल-डिझेलच नाही, तर FASTag साठी सुद्धा तुम्हाला इंश्युरन्स पेपर दाखवावे लागतील. म्हणजेच तुम्हाला तुमच्या वाहनाची वॅलिड थर्ड-पार्टी इंश्युरन्स पॉलिसी FASTag शी लिंक करावी लागेल.
तुमच्याकडे थर्ड-पार्टी इंश्युरन्स प्रूफ असेल, तरच तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल विकत घेता येईल. तसेच, इतर बेनिफिट्सचा फायदा सुद्धा घेता येईल. जर, तुम्ही इंश्युरन्स पॉलिसीशिवाय रस्त्यावर गाडी चालवताना पकडला गेलात, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. कारण, सरकारने फ्यूल खरेदी म्हणजेच पेट्रोल-डिझेल, FASTag आणि पॉल्यूशन- लायसन्स सर्टिफिकेट घेण्यासाठी इंश्युरन्स प्रूफ दाखवणे अनिवार्य केले आहे.
थर्ड पार्टी इंश्युरन्स आवश्यक
भारतात सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी इंश्युरन्स अनिवार्य करण्यात आला आहे. यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. तुमच्याकडे जर कार, बाईक-स्कूटर असल्यास इंश्युरन्स असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता देशातील रस्त्यांवर थर्ड पार्टी इंश्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदा असणार आहे. यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुमच्या वाहनामुळे होणाऱ्या नुकसानापासून थर्ड पार्टी इंश्युरन्स तुमचे संरक्षण करेल.
काय सांगतो मोटर व्हीकल कायदा?
मोटर व्हीकल कायद्यानुसार, रस्त्यावर धावणाऱ्या सर्व वाहनांच थर्ड-पार्टी इंश्यूरन्स कव्हर असले पाहिजे. सरकारने नवीन इंश्युरन्स विकत घेताना FASTag ला वॅलिड थर्ड-पार्टी इंश्युरन्स पॉलिसीसोबत जोडणे अनिवार्य केले आहे. यामुळे, पेट्रोल पंपावर व्हीकलमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरताना इंश्युरन्स काढलाय की, नाही ते चेक होईल. बऱ्याचदा FASTag सिस्टिमच्या माध्यमातून सर्व काही चेक केले जाते. त्यामुळे आता फास्टटॅगमध्येही इंश्युरन्सला जोडावे लागणार आहे.