शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

सावधान! मध्यरात्रीपासून FASTag कंपल्सरी लागू झाला; नसल्यास एवढ्याची पावती फाडणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 16:53 IST

FASTag Mandatory from 15th February midnight : वाहनावर फास्टॅग आहे परंतू तो काम करत नाही, मग काय? केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत रविवारी घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून फास्टॅगबाबत जनजागृती करण्यात येत होती. अनेकदा ही सक्ती पुढे ढकलली होती. अखेर आजपासून फास्ट्रग सर्व वाहनांना सक्तीचा झाला आहे.

आज मध्यरात्रीपासून देशभरात फास्टॅग (FASTag) सर्वांनाच लागू झाला आहे. नितीन गडकरींच्या MoRTH मंत्रालयाने याबाबतची एक अधिसूचना जारी केली आहे. मध्यरात्रीनंतर ज्या वाहनांवर FASTag लावलेला असणार नाही किंवा ज्या वाहनांवर फास्टॅग लावलेला आहे परंतू तो काम करत नाही, त्यांना जबर दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. (FASTag Mandatory from 15th February midnight.)

टोलनाक्यांवर गेल्यावर फास्टॅग नसल्यास वाहनचालकांना त्यांच्या वाहनाच्या प्रकारानुसार दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. 

केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत रविवारी घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून फास्टॅगबाबत जनजागृती करण्यात येत होती. अनेकदा ही सक्ती पुढे ढकलली होती. अखेर आजपासून फास्ट्रग सर्व वाहनांना सक्तीचा झाला आहे. NHAI याआधी 1 जानेवारीपासून कॅश टोल कलेक्शन बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश वाहनचालकांकडे फास्टॅग नसल्याने ही मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविली होती. ही अखेरची मुदवाढ ठरली आहे. 

1 जानेवारी 2021 जेव्हा ठरले तेव्हा त्याआधी आठवडाबर लोकांनी बंपर फास्टॅग खरेदी केले. तसेच 24 डिसेंबरला देशात 80 कोटी रुपयांहून अधिकचा टोल फास्टॅगद्वारे वसूल करण्यात आला होता. हा एकाच दिवशी फास्टॅगद्वारे टोल वसुलीचा मोठा आकडा होता. देशात कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणावर कॅशलेश ट्रान्झेक्शन झाले. याचा फायदा फास्टॅगलाही होणार आहे. 

आता FASTag वापरणे सर्वच वाहनांना बंधनकारक करण्यात आले आहे. ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे. FASTag सेव्हिंग अकाऊंट किंवा डिजिटल वॉलेटला जोडता येते. फास्टॅगद्वारे (FASTag) टोल नाक्यांवरील रांगांमधून लवकर मुक्ती मिळते असा सरकारचा दावा आहे. यामध्ये काही त्रुटी देखील आहेत. त्या दूर केल्या तर फास्टॅग फायद्याचा ठरणार आहे. 

FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज...राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे फास्टॅग कशासाठी असा विचार करणारे बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाहीय. एप्रिल, 2021 पासून हा नियम लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे.

IMP बातमी! FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही; केंद्राचा मोठा नियम बदल

काय असतो फास्टॅग?फास्टॅग हा एक टॅग किंवा स्टिकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर काम करतेटोलनाक्यावरील कॅमेरा स्टिकरवरचा बारकोड स्कॅन करतो आणि टोल आपोआप फास्टॅगच्या वॉलेटमधून कापला जातोवाहनधारकांना टोलनाक्यावर खोळंबावे लागत नाही. त्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होते. प्रवासही झटपट होतो.

Fastag : ‘फास्टॅग’ आहे ना?, वाचा नव्या तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती

टॅग्स :Fastagफास्टॅगNitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाकाMONEYपैसा