Electric Scooters : इलेक्ट्रीक स्कूटर्स लाँच करण्यावर खरंच सरकारनं बंदी घातली का? पाहा काय आहे सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:58 PM2022-04-29T14:58:23+5:302022-04-29T14:59:34+5:30

गेल्या काही दिवसांमध्ये देशात इलेक्ट्रीक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या.

Fact check Has government stopped electric scooter manufacturing over EV fires know what clarification given | Electric Scooters : इलेक्ट्रीक स्कूटर्स लाँच करण्यावर खरंच सरकारनं बंदी घातली का? पाहा काय आहे सत्य?

Electric Scooters : इलेक्ट्रीक स्कूटर्स लाँच करण्यावर खरंच सरकारनं बंदी घातली का? पाहा काय आहे सत्य?

Next

गेल्या काही दिवसांमध्ये देशात इलेक्ट्रीक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. यानंतर सरकारदेखील अॅक्शनमोडमध्ये आलं होतं आणि एक समितीही स्थापन करण्याचे निर्देश दिले होतं. परंतु त्यानंतर आता काही माध्यमांकडून सरकारन इलेक्ट्रीक दुचाकींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना नव्या गाड्या लाँच न करण्याचे निर्देश दिल्याचं सांगण्यात आलं होतं. सरकारनं आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सरकारनं अशाप्रकारचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्ट केलंय.

इलेक्ट्रीक दुचाकींमध्ये आग लागण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारनं उत्पादकांना नव्या इलेक्ट्रीक दुचाकी लाँच न करण्याचा, तसंच ज्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये आग लागल्याची घटना घडली नाही, त्यांनीदेखील नव्या दुचाकी लाँच न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. यावर सरकारनं स्पष्टीकरण देत हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे.


‘इलेक्ट्रीक दुचाकींना लागलेल्या आगीची चौकशी होईपर्यंत कोणत्याही कंपनीनं इलेक्ट्रीक दुचाकी लाँच करू नये असे आदेश सरकारनं दिल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. अशा प्रकारचे कोणतेही निर्देश सरकारकडून देण्यात आले नसून हे वृत्त दिशाभूल करणारं आणि निराधार आहे,’ असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. सरकारनं ट्विटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलंय.

Web Title: Fact check Has government stopped electric scooter manufacturing over EV fires know what clarification given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.