तुमच्याकडे बाईक किंवा कार आहे? मग 31 मार्च आधी नक्की करा 'हे' काम; अन्यथा बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:47 AM2021-03-16T10:47:57+5:302021-03-16T10:56:47+5:30

Bike And Car News : कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला होता.

expired driving license and vehicle registration renewed by 31 march otherwise penalty may have to be paid | तुमच्याकडे बाईक किंवा कार आहे? मग 31 मार्च आधी नक्की करा 'हे' काम; अन्यथा बसेल मोठा फटका

तुमच्याकडे बाईक किंवा कार आहे? मग 31 मार्च आधी नक्की करा 'हे' काम; अन्यथा बसेल मोठा फटका

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Highways) कोरोना महामारीच्या कारणास्तव ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयूसीला 1 फेब्रुवारी नंतर 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. जर तुम्ही आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचं आवश्यक कागदपत्र नूतनीकरण (रिन्यू) न केल्यास 31 मार्चनंतर तुमच्याकडून दंड आकारला जाणार आहे. म्हणूनच तुमच्याकडे बाईक अथवा कार असल्यास लवकरच सर्व कागदपत्र रिन्यू करून घ्या.

कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला होता. कारण, त्यावेळी देशातील सर्व शहरांच्या आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि फिटनेस सर्टिफिकेटची अनेक प्रकरणे प्रलंबित होती. म्हणूनच महामार्ग मंत्रालयाने लोकांच्या समस्या समजून घेत हा निर्णय घेतला. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि फिटनेस प्रमाणपत्र यासारख्या महत्त्वाच्या वाहन कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 अंतर्गत वाहनांचा फिटनेस, परमिट, परवाना, नोंदणी किंवा अन्य कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. सर्व संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता यापुढे वाढवली जाऊ शकत नाही किंवा देशव्यापी बंदमुळे मुदतवाढ देण्यात येणार नाही आणि ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपली आहे, ती 31 मार्च 2021 पर्यंत वैध मानली जातील, असं मंत्रालयाने म्हटलं आहे. 

31 मार्चनंतर नाही राहणार वैध 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 31 मार्चनंतर वाहनांची फिटनेस, परमिट, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांच्या वैधतेच्या निर्णयावर निर्णय घेतला नाही. यामुळे ज्यांनी अद्याप कागदपत्र रिन्यू केले नाहीत. त्यांनी वाहनाची कागदपत्रे लवकरच रिन्यू करून घ्यावीत. अन्यथा 31 मार्चनंतर ती वैध राहणार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भारीच! ड्रायव्हिंग लायसन्स, RC साठी RTO कडे जाण्याची नाही गरज; घरबसल्या ऑनलाईन मिळणार 'या' 18 सुविधा 

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) तयार करणं आता आणखी सोपं होणार आहे. कारण वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. आरटीओशी संबंधित 18 सेवा (RTO Online Services) आता ऑनलाईन झाल्या आहेत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) एक नवीन अधिसूचना जारी केली असून अनेक महत्त्वपूर्ण सेवा डिजिटल करण्यात आल्या आहेत. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नागरिकांना सोयीस्कर व त्रास-मुक्त सेवा देण्यासाठी, अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींच्या माध्यमातून नागरिकांना संपर्करहीत सेवा मिळण्यासाठी, आधार आवश्यक माहितीसाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे. 

'या' 18 सेवा झाल्या ऑनलाईन 

आधार लिंक्ड व्हेरिफिकेशनद्वारे 18 सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण (ज्यास ड्रायव्हिंग चाचणीची आवश्यकता नसते), डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, लायसन्स आणि वाहनांच्या आरसीमध्ये पत्ता बदलणे, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट, परवान्यामधून वाहन श्रेणी सरेंडर करणं, तात्पुरते वाहन नोंदणी यांचा समावेश आहे.  मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी अर्ज अशा सेवांचा समावेश आहे.

Web Title: expired driving license and vehicle registration renewed by 31 march otherwise penalty may have to be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.