EV Car Market India: भारतात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल झपाट्याने वाढताना दिसतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारत आहेत. परिणामी देशातील इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री वार्षिक आधारावर ४४ टक्क्यांनी वाढून १३,७३३ युनिटपर्यंत पोहोचली आहे.
मा,त्र जानेवारी २०२६ च्या तुलनेत विक्रीत घट झाली आहे. जानेवारीमध्ये १८,४७० इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या होत्या, तर फेब्रुवारीमध्ये हा आकडा १३,७३३ युनिटवर आला. जानेवारीनंतर सामान्यतः मागणीत होणारी घट आणि फेब्रुवारी हा कमी दिवसांचा महिना असणे ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.
टाटा मोटर्स टॉपवर
इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये फेब्रुवारी २०२६ मध्येही टाटा मोटर्सने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कंपनीने या महिन्यात एकूण ५,५६८ इलेक्ट्रिक कारची विक्री केली. मागील वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये टाटाने ४,०२० युनिट विक्री केली होती. त्यामुळे यंदा विक्रीत सुमारे ३८.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, जानेवारी २०२६ मध्ये कंपनीने ८,००७ युनिट विक्री केली होती. त्यामुळे महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये सुमारे ३० टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
महिंद्राची विक्रीत मोठी झेप
इलेक्ट्रिक कार बाजारात महिंद्रा कंपनीने सर्वाधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये कंपनीने २,९१३ इलेक्ट्रिक कारची विक्री केली. मागील वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये हा आकडा केवळ ५०८ युनिट होता. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत तब्बल ४७३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, जानेवारी २०२६ च्या तुलनेत विक्रीत सुमारे २० टक्क्यांची घटही नोंदवली गेली.
MG मोटर दुसऱ्या स्थानावर
इलेक्ट्रिक कार विक्रीच्या बाबतीत JSW MG मोटर दुसऱ्या स्थानावर राहिली. कंपनीने फेब्रुवारी २०२६ मध्ये ३,३१२ युनिट विक्री केली. मात्र ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. तसेच जानेवारीच्या तुलनेत सुमारे २९ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
इतर कंपन्यांची कामगिरी
इतर कंपन्यांच्या विक्रीचा आढावा घेतला असता, व्हिएतनामची VinFast कंपनीने फेब्रुवारीमध्ये ३८४ इलेक्ट्रिक कार विकल्या. चीनच्या BYD कंपनीने ३०६ युनिट विक्री केली असून तिच्या विक्रीत वार्षिक आणि मासिक दोन्ही आधारांवर वाढ झाली आहे. याशिवाय, हुंडईने फेब्रुवारीमध्ये ३०४ इलेक्ट्रिक कारची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. तर, किआ कंपनीने २९५ युनिट विक्री करत चांगली वाढ नोंदवली आहे.
लक्झरी सेगमेंटमध्ये BMW ने २४५ आणि मर्सिडीजने ६५ इलेक्ट्रिक कार विकल्या. याशिवाय मारुतीने २१४, टेस्लाने २९ आणि वोल्वोने २५ इलेक्ट्रिक कारची विक्री नोंदवली आहे. भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याचे हे आकडे स्पष्ट दर्शवतात. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांमुळे आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे आगामी काळातही इलेक्ट्रिक कार बाजारात वेगाने वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Web Summary : India's EV car market sees a 44% sales surge. Tata Motors leads despite a monthly dip. Mahindra shows biggest growth. MG Motor secures second position in sales.
Web Summary : भारत के ईवी कार बाजार में 44% की वृद्धि देखी गई। टाटा मोटर्स मासिक गिरावट के बावजूद शीर्ष पर है। महिंद्रा ने सबसे अधिक वृद्धि दिखाई। एमजी मोटर ने बिक्री में दूसरा स्थान हासिल किया।