इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:01 IST2025-10-01T14:52:11+5:302025-10-01T15:01:33+5:30
Ev 2wheeler sale September 2025: टीव्हीएसने आपला पहिला क्रमांक आणि एथरने आपला तिसरा क्रमांक काय ठेवला आहे. हिरोच्या विडाला देखील फटका बसला आहे.

इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
सप्टेंबरमध्ये झालेल्या जीएसटी कपातीपासून दूर राहिलेल्या ईलेक्ट्रीक दुचाकी वाहनांच्या बाजारात मोठा उलटफेर पहायला मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात थेट पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या बजाज चेतकने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेली चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. टीव्हीएसने आपला पहिला क्रमांक आणि एथरने आपला तिसरा क्रमांक काय ठेवला आहे. हिरोच्या विडाला देखील फटका बसला आहे.
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
ओलाने ऑगस्टमध्ये 18,972 युनिट्स विकल्या होत्या. सप्टेंबरमध्ये विक्री १२,२२३ युनिट्सपर्यंत घसरली आहे. बजाज ऑटोने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ऑगस्ट महिन्यात त्यांची विक्री घटली होती, पण सप्टेंबरमध्ये १७,९७२ युनिट्सची विक्री करून त्यांनी आपले स्थान पुन्हा मिळवले. बजाजने ऑगस्टमध्ये 11,730 युनिट्स विकले होते. विडालाही फटका बसला आहे. ऑगस्टमध्ये विडाने १३,३१३ स्कूटर विकल्या होत्या, तो आकडा आता ११,८५६ युनिट्सवर आला आहे.
टीव्हीएस मोटरने या महिन्यात २१,०५२ युनिट्स विक्री करून २१.९% मार्केट शेअर मिळवला आहे. एथरने तिसऱ्या स्थानावर धडक मारत १६,५५८ युनिट्स (१७.२% शेअर) विकल्या, जी गेल्या वर्षीच्या १४.६% पेक्षा लक्षणीय वाढ आहे. गेल्या ऑगस्टमध्ये एथर एनर्जीने १७,८५६ युनिट्स विकले होते. तर टीव्हीएसने 24,087 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या होत्या.
एम्पीयरने ३,९१२ युनिट्स (४.१% शेअर), बीगॉसने २,०७८ युनिट्स (२.२% शेअर), प्युअर ईव्हीने १,६७४ युनिट्स (१.७% शेअर) आणि रिव्हरने १,५१९ युनिट्स (१.६% शेअर) विक्री केल्या.
ओलाचे बरेचसे शोरुम बंद...
महाराष्ट्रासह देशभरात ओलाचे बरेचसे शोरुम बंद झाले आहेत. ट्रेड सर्टिफिकीट न काढल्याने त्या त्या राज्यांनी ओलाला नोटीस पाठविल्या होत्या. यामुळे मुंबई, पुण्यासह ओलाचे बरेचसे शोरुम बंद आहेत. याचा फटका ओलाला बसत आहे.