इलेक्ट्रिक वाहनांचा वेग सुसाट! विक्रीत ४४ टक्क्यांची मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:25 IST2026-03-07T04:25:18+5:302026-03-07T04:25:28+5:30

नवी दिल्ली : भारतीय वाहन बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) क्रेझ सातत्याने वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ...

Electric vehicles are gaining momentum! Sales jump by 44 percent | इलेक्ट्रिक वाहनांचा वेग सुसाट! विक्रीत ४४ टक्क्यांची मोठी झेप

इलेक्ट्रिक वाहनांचा वेग सुसाट! विक्रीत ४४ टक्क्यांची मोठी झेप

नवी दिल्ली : भारतीय वाहन बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) क्रेझ सातत्याने वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक ४४ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढून १३,७३३ झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात ही विक्री ९,५०५ इतकी होती.

प्रवासी वाहनांमध्ये टाटा मोटर्सची बाजी
फेब्रुवारी २०२५ मध्ये ९,५०५ इलेक्ट्रिक कारची विक्री झाली होती, जो आकडा यंदा १३,७३३ वर पोहोचला आहे. 
या क्षेत्रात टाटा मोटर्सने आपले वर्चस्व कायम राखले असून, एकूण विक्रीत त्यांचा वाटा ३८.५ टक्के इतका आहे. 
दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या विक्रीत मोठी सुधारणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कंपनी     ईव्ही कार विक्री
टाटा मोटर्स     ५,५६८
एमजी मोटर इंडिया     ३,३१२
महिंद्रा अँड महिंद्रा     २,९१३
विनफास्ट ऑटो     ३८४
बीवायडी इंडिया     ३०६
एकूण     १३,७३३

४६% इतकी वाढ इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत झाली. फेब्रुवारीत एकूण १,११,७०९ दुचाकींची विक्री झाली. ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीत ५४ टक्क्यांची घसरण झाली आहे. 

Web Title : इलेक्ट्रिक वाहनों की बिक्री में उछाल! फरवरी में 44% की वृद्धि

Web Summary : भारत में इलेक्ट्रिक वाहनों का बाजार तेजी से बढ़ रहा है। फरवरी में इलेक्ट्रिक यात्री वाहनों की बिक्री में 44% की वृद्धि हुई, जो 13,733 यूनिट तक पहुंच गई। टाटा मोटर्स 38.5% बाजार हिस्सेदारी के साथ शीर्ष पर है, जबकि महिंद्रा एंड महिंद्रा ने मजबूत विकास दिखाया। इलेक्ट्रिक दोपहिया वाहनों की बिक्री में भी 46% की वृद्धि हुई।

Web Title : Electric Vehicle Sales Surge! 44% Growth in February

Web Summary : India's electric vehicle market is booming. February saw a 44% jump in EV passenger vehicle sales, reaching 13,733 units. Tata Motors dominates with 38.5% market share, while Mahindra & Mahindra shows strong growth. Electric two-wheeler sales also rose by 46%.