शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

देशात अवघे 350 ई-चार्जिंग स्टेशन; कार चार्ज कशी करायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 17:28 IST

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी सामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असताना वाहनेही प्रदुषणाचा स्तर वाढवत चालली आहेत. दोन्ही समस्यांवरील उपाय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे पाहिले जात आहे.

नवी दिल्ली : एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी सामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असताना वाहनेही प्रदुषणाचा स्तर वाढवत चालली आहेत. दोन्ही समस्यांवरील उपाय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे पाहिले जात आहे. केंद्र सरकार जरी सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक वाहनांवर जोर देत असली तरीही प्रत्यक्षात त्यासाठीच्या पायाभूत सुविधांची वानवा आहे. ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याची मोठी गरज आहे. मात्र, आज पेट्रोल पंप 60 हजार तर चार्जिंग स्टेशन केवळ 350 आहेत. यामुळे विजेवर चालणारी वाहने चार्ज कशी करायची असा प्रश्न निर्माण होत आहे.

 पेट्रोलला पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी एलपीजी गॅसवर वाहने चालविण्यात येऊ लागली. मात्र, एलपीजीचे पंप ग्रामीण भागात जाईपर्यंत सीएनजी गॅस वरील वाहने आली आणि एलपीजी पंप मागे पडले. सीएनजी येऊन 7-8 वर्षे झाली तरीही अद्याप शहरी भागातही सीएनजी पंपांचे जाळे उभारणे सरकारला जमले नव्हते. सध्या सीएनजी केवळ मुंबई, पुण्यासारख्याच शहरांमध्ये उपलब्ध आहे. आता इलेक्ट्रीक वाहनांवर सरकार जोर देत आहे. 

केंद्र सरकार पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये ई-चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारणार आहे. या योजनेनुसार 30 हजार स्लो चार्जिंग स्टेशन आणि 15 हजार फास्ट चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. शहरात प्रत्येक 3 किमीवर दोन फास्ट चार्जिंग पॉईंट आणि एक स्लो चार्जिंग पॉईंट लावण्य़ात येणार आहे. तर हायवेंवर प्रत्येक 50 किमीवर एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. ही स्टेशन सरकारी आणि खासगी सहकारातूनही उभारण्यात येतील. तसेच कंपन्याही खासगीरित्या चार्जिंग पॉईंट उभारू शकणार आहेत. एकट्या दिल्लीला 3000 चार्जिंग स्टेशनांची गरज आहे. 

ईव्ही धोरणाची कमतरतादेशातील एकूण बाजारात 30 टक्के विजेवर चालणाऱ्या वाहनांचे लक्ष्य पूर्ण करता येईल. उद्योगही सक्षम आहेत. मात्र, सरकारचे धोरण अधिक स्पष्ट हवे. सरकारच अजून चाचपडत असल्याचे हिरे इलेक्ट्रीकचे सीईओ सोहिंदर गिल यांनी सांगितले. पेट्रोल डिझेलसाठी मागील 15 वर्षांपासून धोरण आहे. त्यातील बदलांनुसार काम चालते. तसेच इलेक्ट्रीक वाहनांचेही धोरण 10 वर्षांचे असायला हवे, असेही गिल म्हणाले. 

विजेचे काय?डिजिटल युग असल्याने आज विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. यात विजेवर चालणारी वाहने येणार असल्याने ही मागणी 16 हजार कोटी युनिट वीज लागणार आहे.  सध्या आपल्याकडील प्रकल्पांचा उत्पादन क्षमता 3.44 लाख मेगावॅट आहे. यापैकी 56 टक्के म्हणजेच 1.96 लाख मेगावॅट वीज कोळशापासून तयार होते. जर विजेवरील वाहनांसाठी जादाची वीज हवी असल्यास जलउर्जा, सौरउर्जा सारख्या पर्यावरणीय स्त्त्रोतांपासून उर्जा निर्मिती करावी लागणार आहे. अन्यथा कोळशापासून वीज निर्मिती वाढविल्यास वीज टंचाईसोबत प्रदुषणही तसेच राहणार आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनelectricityवीजAutomobileवाहन