शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाचा परिणाम? आता E30 पेट्रोल! इथेनॉल मिश्रण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी; कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार मोठी बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:27 IST

E30 Petrol, Diesel India Marathi News: भारतात आता E30 पेट्रोलची तयारी! ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनची (AIDA) सरकारकडे ३०% एथेनॉल ब्लेंडिंगची मागणी. कच्च्या तेलाची आयात कमी होणार. वाचा सविस्तर अपडेट.

मध्य पूर्वेतील युद्धाचा भडका आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, 'ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन'ने (AIDA) केंद्र सरकारकडे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २०% वरून ३०% (E30) पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. इथेनॉल उद्योगाने देशाची इंधन सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि महागड्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

AIDA च्या प्रमुख मागण्यापेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण टप्प्याटप्प्याने ३०% पर्यंत वाढवावे, ब्राझीलच्या धर्तीवर १००% इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना (FFVs) प्रोत्साहन द्यावे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलमध्येही इथेनॉल मिश्रणाच्या शक्यता पडताळून पहाव्यात, ज्यामुळे इंधन खर्च कमी होईल. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी इथेनॉलवर आधारित स्वयंपाकाच्या शेगड्यांना प्रोत्साहन द्यावे.

देशाला काय होणार फायदा?

आयात खर्चात बचत: इथेनॉलचे प्रमाण वाढल्यास कच्च्या तेलाच्या आयातीवर होणारा अब्जावधी डॉलर्सचा खर्च वाचेल.

पर्यावरण रक्षण: इथेनॉल हे स्वच्छ इंधन असल्याने कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि हवेचे प्रदूषण कमी होईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न: ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी इथेनॉलची वाढती मागणी उत्पन्नाचा मोठा स्रोत ठरेल.

सध्याची स्थितीभारताने यापूर्वीच पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल ब्लेंडिंगचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच गाठले आहे. सध्या देशात इथेनॉलची उत्पादन क्षमता अंदाजे २,००० कोटी लिटर असून ३८० हून अधिक डिस्टिलरीज कार्यरत आहेत. वाढीव क्षमतेचा वापर करण्यासाठी आता E30 कडे वळणे गरजेचे असल्याचे एआयडीएने नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War Impact: India Considers E30 Fuel, Reduces Crude Oil Imports.

Web Summary : Amidst rising crude oil prices, the All India Distillers Association urges the government to increase ethanol blending in petrol to 30% (E30). This move aims to bolster fuel security, reduce import dependence, cut emissions, and boost farmer income. India has already achieved E20 blending.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर