युद्धाचा परिणाम? आता E30 पेट्रोल! इथेनॉल मिश्रण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी; कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार मोठी बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:27 IST2026-03-24T10:26:49+5:302026-03-24T10:27:24+5:30

E30 Petrol, Diesel India Marathi News: भारतात आता E30 पेट्रोलची तयारी! ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनची (AIDA) सरकारकडे ३०% एथेनॉल ब्लेंडिंगची मागणी. कच्च्या तेलाची आयात कमी होणार. वाचा सविस्तर अपडेट.

E30 Petrol, Diesel India Marathi News: Result of war? Now cars will run on E30 petrol! Demand to increase ethanol blend to 30 percent; Big savings on crude oil import | युद्धाचा परिणाम? आता E30 पेट्रोल! इथेनॉल मिश्रण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी; कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार मोठी बचत

युद्धाचा परिणाम? आता E30 पेट्रोल! इथेनॉल मिश्रण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी; कच्च्या तेलाच्या आयातीवर होणार मोठी बचत

मध्य पूर्वेतील युद्धाचा भडका आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, 'ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन'ने (AIDA) केंद्र सरकारकडे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २०% वरून ३०% (E30) पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. इथेनॉल उद्योगाने देशाची इंधन सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि महागड्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

AIDA च्या प्रमुख मागण्या
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण टप्प्याटप्प्याने ३०% पर्यंत वाढवावे, ब्राझीलच्या धर्तीवर १००% इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना (FFVs) प्रोत्साहन द्यावे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलमध्येही इथेनॉल मिश्रणाच्या शक्यता पडताळून पहाव्यात, ज्यामुळे इंधन खर्च कमी होईल. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी इथेनॉलवर आधारित स्वयंपाकाच्या शेगड्यांना प्रोत्साहन द्यावे.

देशाला काय होणार फायदा?

आयात खर्चात बचत: इथेनॉलचे प्रमाण वाढल्यास कच्च्या तेलाच्या आयातीवर होणारा अब्जावधी डॉलर्सचा खर्च वाचेल.

पर्यावरण रक्षण: इथेनॉल हे स्वच्छ इंधन असल्याने कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि हवेचे प्रदूषण कमी होईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न: ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी इथेनॉलची वाढती मागणी उत्पन्नाचा मोठा स्रोत ठरेल.

सध्याची स्थिती
भारताने यापूर्वीच पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल ब्लेंडिंगचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच गाठले आहे. सध्या देशात इथेनॉलची उत्पादन क्षमता अंदाजे २,००० कोटी लिटर असून ३८० हून अधिक डिस्टिलरीज कार्यरत आहेत. वाढीव क्षमतेचा वापर करण्यासाठी आता E30 कडे वळणे गरजेचे असल्याचे एआयडीएने नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title : युद्धाचा परिणाम: भारत E30 इंधनाचा विचार, कच्च्या तेलाची आयात घट.

Web Summary : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनने सरकारला पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 30% (E30) पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. या मागणीचा उद्देश इंधन सुरक्षा मजबूत करणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, उत्सर्जन कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आहे. भारताने यापूर्वीच E20 मिश्रण साध्य केले आहे.

Web Title : War Impact: India Considers E30 Fuel, Reduces Crude Oil Imports.

Web Summary : Amidst rising crude oil prices, the All India Distillers Association urges the government to increase ethanol blending in petrol to 30% (E30). This move aims to bolster fuel security, reduce import dependence, cut emissions, and boost farmer income. India has already achieved E20 blending.