२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:56 IST2025-09-24T11:54:25+5:302025-09-24T11:56:45+5:30

E20 Petrol Problem and Solution: केंद्र सरकारने इथेनॉल ब्लेंड पेट्रोल आता सक्तीचे केले आहे. सक्तीचे अशासाठी कारण साधे पेट्रोलच मिळत नाहीय.

E20 Petrol Trick: How to quench the sting of 20 percent ethanol? Use this trick when filling up with petrol... | २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

सध्या वाहन मालकांत २० टक्के इथेनॉलची मोठी दहशत निर्माण झाली आहे. देशभरातील वाहन मालक आपल्या गाड्यांचे मायलेज कमी झालेय, मेंटेनन्स वाढला असल्याच्या तक्रारी करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याला आपल्याविरोधातील पेड प्रमोशन मानत आहेत. परंतू, ज्याच्यासोबत घडते त्यालाच त्याची धग कळते, या प्रमाणे वाहन मालकांची पेट्रोल गाड्यांनी हालत पुरती खस्ता करून सोडली आहे. 

चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...

केंद्र सरकारने इथेनॉल ब्लेंड पेट्रोल आता सक्तीचे केले आहे. सक्तीचे अशासाठी कारण साधे पेट्रोलच मिळत नाहीय. पेट्रोल, डिझेल या गोष्टी सरकारच्या अखत्यारीत असल्याने सरकारने २० टक्के इथेनॉलच पेट्रोल पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून दिल्याने वाहन मालकांसमोर जास्त पर्याय राहिलेले नाहीत. यामुळे २०२२ किंवा त्यापूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचे मायलेज कमालीचे घसरल्याचा दावा वाहन मालक करत आहेत. 

इथेनॉलच्या डंखातून वाचण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

तुमच्याकडे जर 2022 किंवा त्यापूर्वीची पेट्रोल गाडी असेल, जी इथेनॉल मिश्रित इंधनासाठी डिझाइन केलेली नाही, तर तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरून इथेनॉलचा तुमच्या इंजिनवरील नकारात्मक प्रभाव कमी करू शकता:

  1. कमी इथेनॉल असलेले पेट्रोल निवडा:

    • तुम्ही सध्या रिलायन्सच्या जिओ-बीपी (Jio-BP) पेट्रोल पंपांवर उपलब्ध असलेले 7-8% इथेनॉल असलेले पेट्रोल वापरू शकता. हे E20 पेट्रोलपेक्षा इंजिनसाठी कमी हानिकारक ठरू शकते.

    • काही इंडियन ऑईल (Indian Oil) सारख्या पेट्रोल पंपांवर 'एक्स्ट्रामिईल' (XtraMile) किंवा 'पॉवर' (Power) यांसारख्या ब्रँडखाली थोडे जास्त दराने इथेनॉल मुक्त किंवा कमी इथेनॉल असलेले पेट्रोल उपलब्ध असते. त्याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

  2. शून्य आणि 20% इथेनॉल पेट्रोलचे मिश्रण:

    • हे पेट्रोल परवडणारे नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही एक सोपी युक्ती वापरू शकता. समजा तुमच्या कारची इंधन टाकी 40 लीटरची आहे, तर तुम्ही 20 ते 22 लीटर शून्य टक्के इथेनॉल असलेले पेट्रोल (किंवा कमी इथेनॉल असलेले) वापरू शकता.

    • उरलेले 18-20 लीटर पेट्रोल तुम्ही 20% इथेनॉल असलेले पेट्रोल भरू शकता. यामुळे टाकीतील एकूण इथेनॉलचे प्रमाण 8-10% पर्यंत खाली येईल.

    • हे प्रमाण तुमच्या इथेनॉल वापरासाठी नसलेल्या इंजिनसाठी कमी विषारी ठरेल. यामुळे तुमच्या गाडीचे मायलेज सुधारेल आणि इंजिनचे नुकसान होण्याचा धोकाही कमी होईल.

  3. दुचाकी वाहनांसाठी:

    • तुमची स्कूटर साधारण 5 लीटरची टाकी असेल किंवा मोटरसायकलची टाकी 10 ते 13 लीटरची असेल, तर त्यातही तुम्ही वरीलप्रमाणे निम्मे शून्य इथेनॉलचे पेट्रोल आणि निम्मे 20% इथेनॉलचे पेट्रोल वापरू शकता.

(टीप: तुम्ही याबाबत तुमच्या ओळखीच्या चांगल्या गॅरेज मेकॅनिकचा सल्ला घ्यावा.)
 

Web Title: E20 Petrol Trick: How to quench the sting of 20 percent ethanol? Use this trick when filling up with petrol...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.