डस्टर इज बॅक! १०.४९ लाखांत रेनोची एसयुव्ही भारतात परतली; पाहा फिचर्स आणि पूर्ण प्राईस लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:13 IST2026-03-17T13:11:59+5:302026-03-17T13:13:50+5:30

Renault Duster Launch India Price: अखेर डस्टरचे पुनरागमन! १०.४९ लाखांची सुरुवातीची किंमत आणि १६३ PS इंजिनसह ही कार क्रेटा आणि सेल्टोसला टक्कर देणार.

Duster is back! Renault Duster makes a strong comeback in India at Rs 10.49 lakh; See features and full price list | डस्टर इज बॅक! १०.४९ लाखांत रेनोची एसयुव्ही भारतात परतली; पाहा फिचर्स आणि पूर्ण प्राईस लिस्ट

डस्टर इज बॅक! १०.४९ लाखांत रेनोची एसयुव्ही भारतात परतली; पाहा फिचर्स आणि पूर्ण प्राईस लिस्ट

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही सेगमेंटची ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध कार 'रेनो डस्टर' नव्या अवतारात परतली आहे. रेनो इंडियाने अधिकृतपणे २०२६ मॉडेल डस्टर भारतात लाँच केले असून, याची सुरुवातीची किंमत १०.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

रेनोने ही कार पाच वेगवेगळ्या मॉडेलमध्ये सादर केली असून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवड करता येईल:
१. Authentic (ऑथेंटिक): १०.४९ लाख रुपये
२. Evolution (इव्होल्यूशन): ११.६९ लाख रुपये
३. Techno (टेक्नो): १३.४९ लाख रुपये
४. Techno+ (टेक्नो प्लस): १५.२९ लाख रुपये
५. Iconic (आयकॉनिक): १६.९९ लाख ते १८.४९ लाख रुपये

इंजिन आणि परफॉर्मन्स
नवीन डस्टर दोन दमदार इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.  १.०-लिटर टर्बो पेट्रोल: १०० PS पॉवर आणि १६० Nm टॉर्क. १.३-लिटर टर्बो पेट्रोल: १६३ PS पॉवर आणि २८० Nm टॉर्क (यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड DCT ऑटोमॅटिकचा पर्याय आहे). तर हायब्रीड व्हर्जनमध्ये कंपनीने १८० PS शक्ती असलेले हायब्रीड इंजिन देखील प्रस्तावित केले आहे, जे दिवाळीच्या सुमारास उपलब्ध होऊ शकते.

लुक: १८-इंच अलॉय व्हील्स, वाय-शेप एलईडी डीआरएल आणि २१२ मिमीचा जबरदस्त ग्राऊंड क्लीयरन्स.

इंटीरियर: १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो.

सुरक्षा: ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे Level 2 ADAS सुरक्षा फिचर्स.

Web Title : रेनॉल्ट डस्टर भारत में ₹10.49 लाख में वापस: फीचर्स, कीमत

Web Summary : रेनॉल्ट डस्टर भारत में ₹10.49 लाख की शुरुआती कीमत के साथ वापस आ गई है। पांच मॉडलों में उपलब्ध, इसमें एक हाइब्रिड, आधुनिक इंटीरियर और लेवल 2 ADAS जैसी उन्नत सुरक्षा सुविधाओं सहित शक्तिशाली इंजन विकल्प हैं।

Web Title : Renault Duster back in India at ₹10.49 Lakh: Features, Price

Web Summary : Renault Duster returns to India with a starting price of ₹10.49 lakh. Available in five models, it features powerful engine options, including a hybrid, modern interiors, and advanced safety features like Level 2 ADAS.