शानदार Ducati Desert X Discovery चे बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:14 IST2025-01-30T10:14:33+5:302025-01-30T10:14:45+5:30
Ducati Desert X Discovery : डुकाटीने भारतीय मार्केटमध्ये आपली नवीन अॅडव्हेंचर बाईक डेझर्टएक्स डिस्कव्हरी (DesertX Discovery) लाँच केली आहे.

शानदार Ducati Desert X Discovery चे बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...
Ducati Desert X Discovery : गेल्या काही दिवसांपासून भारतीय ऑटो मोबाईल मार्केटमध्ये वाहनांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या आपली वाहने मार्केटमध्ये आणत आहेत. अशातच डुकाटीने भारतीय मार्केटमध्ये आपली नवीन अॅडव्हेंचर बाईक डेझर्टएक्स डिस्कव्हरी (DesertX Discovery) लाँच केली आहे. ही बाईक आता बुकिंगसाठी तयार आहे. या बाईकची किंमत २१.७५ लाख रुपये(एक्स-शोरूम) आहे, जी स्टँडर्ड डेझर्ट एक्स पेक्षा जवळपास ३.४२ लाख रुपये जास्त आहे.
अॅडव्हेंचर बाईक डेझर्टएक्स डिस्कव्हरी या बाईकमध्ये ९३७ सीसी टेस्टास्ट्रेटा एल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. तसेच, हे इंजिन १०८ बीएचपी पॉवर आणि ९२ एनएम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या बाईकमध्ये एंड्युरो आणि रॅली मोडसह ६ रायडिंग मोड्स आहेत. तसेच, यामध्ये ४६ mm पूर्णपणे अॅडजस्टेबल यूएसडी फ्रंट फोर्क आणि केव्हायबी मोनोशॉक रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे. या बाईकच्या फ्रंट बाजूला ३२० mm ड्युअल डिस्क आणि रिअर बाजूला २६५ mm सिंगल डिस्क ब्रेक आहे.
डेझर्टएक्स डिस्कव्हरीच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये हीटेड ग्रिप्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अॅल्युमिनियम पॅनियर्स, सेंटर स्टँड देण्यात आले आहे. तसेच, नवीन रेड, ब्लॅक आणि व्हाईट कलर स्कीमचा ऑप्शन मिळू शकतो. डेझर्टएक्स डिस्कव्हरी विशेषतः लांब पल्ल्याच्या टूरिंग आणि ऑफ-रोड अॅडव्हेंचरसाठी डिझाइन केलेली आहे, ज्यात हाय-टेक्नॉलॉजीचे फीचर्स आहेत.
जर तुम्हीही महागडी आणि प्रीमियम अॅडव्हेंचरबाईक पाहत असाल तर डुकाटी डेझर्टएक्स डिस्कव्हरी तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑप्शन आहे. लूक आणि हाय-टेक्नॉलॉजीमुळे ही बाईक इतर स्पोर्ट्स बाईकपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. डुकाटी डेझर्टएक्स डिस्कव्हरीची किंमत थोडी जास्त आहे. त्यामुळे तुमच्या खिशावर ताण पडू शकते, मात्र, या बाईकमधील फीचर्स पाहता तुम्ही निराश करणार नाही.