शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

Airbag : कारमध्ये पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य; 1 एप्रिलपासून लागू होणार नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 1:32 PM

Car Airbag : 1 एप्रिल 2021 पासून, तयार केलेल्या नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणं आवश्यक असेल.

नवी दिल्ली - कारमधील पुढच्या सीटवरील प्रवाशांसाठी आता एअरबॅग (Airbags) अनिवार्य करण्यात आल्या आहेत. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, एअरबॅग अनिवार्य करण्याच्या तरतूदीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवेदनात वाहनांमध्ये ड्रायव्हरसाठी आणि त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा एक महत्त्वाचा सुरक्षा उपाय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने त्याबाबत सूचना केली होती असं म्हटलं आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2021 पासून, तयार केलेल्या नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणं आवश्यक असेल. जुन्या वाहनांच्या संदर्भात, 31 ऑगस्ट 2021 पासून सध्याच्या मॉडेल्समध्ये ड्रायव्हरच्या सीटसह एअरबॅग देणं बंधनकारक असेल. अपघातप्रसंगी या एअरबॅग प्रवशांचा जीव वाचवतील. दरम्यान, नवीन नियम लागू झाल्याने वाहनांच्या किंमती कमीत कमी 5000-7000 रुपयांनी वाढतील असा अंदाज आहे. याआधी 29 डिसेंबर 2020 रोजी सरकारने सांगितले होते की, 1 एप्रिल 2021 पासून नवीन वाहनांसाठी आणि 1 जून 2021 पासून जुन्या वाहनांसाठी डबल एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जुन्या वाहनांमध्ये एअरबॅगची मुदत तीन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात आली आहे.

एअरबॅग किती वेगाने उघडते? कसे काम करते? जाणून घ्या...

कारमधून प्रवास करणारे प्रवासी एखाद्या अपघाताला सामोरे गेले तर त्यांना कमीतकमी दुखावत व्हावी आणि प्राण वाचावेत असा यामागचा उद्देश आहे. एअरबॅग म्हणजे हवेचा फुगा नसतो तर ती आतमध्ये असताना हवा नसलेल्या पिशवीसारखीच असते. कारच्या स्टेअरिंगमध्ये, डॅशबोर्ड आणि पॅसेंजरच्या बाजुला एअरबॅग बसवलेल्या असतात. जेव्हा कधी अपघात होतो तेव्हा ही एअरबॅग तब्बल 350 किमी प्रति तासाच्या वेगाने उघडते. कारचा वेग यासाठी विचारात घेतला जातो. 

जेव्हा कारचा वेग 30 ते 40 किमीपेक्षा जास्त असतो तेव्हा या एअरबॅग उघडतात. ही वेगमर्यादा वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी असू शकते. अपघातावेळी ठोकर लागल्याचक्षणी एअरबॅग उघडली तरच आतील व्यक्ती वाचू शकते. यामुळे ही एअरबॅग अवघ्या काही सेकंदांच्या काही भागात कार्यरत होऊन त्यात हवा भरली जाणे गरजेचे असते. यासाठी कारला सेन्सर लावलेले असतात. या सेन्सरला आघात झाल्याचे जाणवल्यास सेकंदाच्या चौथ्या भागात एअरबॅगला सूचना दिली जाते. यानंतर 350 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने ही एअरबॅग उघडते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :carकारIndiaभारत