Driving License: तुमच्या फोनमध्ये ‘असं’ Save करा ड्रायव्हिंग लायसन्स; दंड भरण्याची चिंता मिटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:43 PM2021-08-28T22:43:32+5:302021-08-28T22:43:58+5:30

हे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही वाहतूक पोलिसांना दाखवलं तर त्याचे चलान तुम्हाला बसणार नाही

Driving License: Save the driving license in your phone; The worry of paying the fine will go away | Driving License: तुमच्या फोनमध्ये ‘असं’ Save करा ड्रायव्हिंग लायसन्स; दंड भरण्याची चिंता मिटेल

Driving License: तुमच्या फोनमध्ये ‘असं’ Save करा ड्रायव्हिंग लायसन्स; दंड भरण्याची चिंता मिटेल

googlenewsNext

नवी दिल्ली – तुम्ही गाडी घेऊन कुठेही गेला तरी ड्रायव्हिंग लायसन्स सोबत असणं कायद्यानं बंधनकारक आहे. जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पोलिसांकडून तुम्हाला दंड आकारणी केली जाते. काहीवेळा ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरता त्यामुळे नाहक तुम्हाला भुर्दंड भरावा लागतो. अनेकांना भीती असते की, जर ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं तर पुन्हा ते नवीन काढण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या चक्करा माराव्या लागतील.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कधीही गाडी घेऊन बाहेर गेला आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसलं तरी टेन्शन घेऊन नका. पोलिसदेखील तुम्हाला दंड आकारू शकत नाहीत. ड्रायव्हिंग लायसन्स(Driving License) सोबत नसेल तरी तुमच्याकडे Digilocker अथवा mParivahan App च्या मदतीनं त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून घेऊ शकता.

हे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही वाहतूक पोलिसांना दाखवलं तर त्याचे चलान तुम्हाला बसणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने २०१८ मध्ये एक मार्गदर्शक परिपत्रक काढलं होतं. त्यात Digilocker अथवा mParivahan App च्या माध्यमातून आवश्यकता भासल्यास ड्रायव्हिंग लायसन्स दाखवलं जाऊ शकतं असं म्हटलं आहे. आता डिजिलॉकरवर तुम्ही तुमचं अकाऊंट कसं बनवू शकता याबद्दल जाणून घेऊया.

अशाप्रकारे बनवा DigiLocker मध्ये खातं

सर्वात पहिलं तुम्ही DigiLocker वर जाऊन अकाऊंट बनवा. अकाऊंट बनवल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि आधार कार्ड माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानंतर DigiLocker मध्ये तुम्ही ६ अंकी पिन टाकून युजरनेमसह साइन इन करा. त्यानंतर रजिस्टर्ड नंबरवर वन टाइम पासवर्ड येईल. या पासवर्डच्या साहय्याने तुम्ही DIgiLocker मध्ये जाऊ शकता. त्याठिकाणी सर्चबारवर जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स चेक करा. जेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दाखवायचं असेल तेव्हा त्या राज्याचं नाव क्लिक करा जिथं तुम्ही लायसन्स बनवलं आहे. त्यानंतर तुमचा लायसन्स नंबर टाकून Get Document बटणावर क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करा

जेव्हा तुमच्यासमोर ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉप ओपन होते तेव्हा ती डाऊनलोड करून सेव्ह करा. तुम्ही DigiLocker मध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी सेव्ह ठेऊ शकता. त्यामुळे कधीही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरल्यास किंवा ते बाळगण्याची चिंता नाही. ड्रायव्हिंग लायसन्स हरवण्याची अथवा घाळ होण्याची भीती नाही.

Web Title: Driving License: Save the driving license in your phone; The worry of paying the fine will go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.