लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 19:27 IST2025-09-07T19:27:04+5:302025-09-07T19:27:22+5:30
कार कंपन्या देखील केकवरील टॉपिंग्ज म्हणून विक्रीसाठी या सनरुफचा वापर करतात. परंतू, नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहिलात तर तुमचा थरकाप उडणार आहे.

लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
आजकाल अनेकांना सनरुफवाली कार हवी आहे. कारण त्यांच्या मुलांना ते हवे आहे. अनेकदा तुम्ही सनरुफ उघडलेली आणि त्यातून मुले बाहेर डोकावत असलेले पाहता. मुळात सनरुफ हा परदेशात उन्हाची गरज म्हणून असतो. परंतू भारतात तो मुलांना सैर घडविण्यासाठी वापरला जातो. कार कंपन्या देखील केकवरील टॉपिंग्ज म्हणून विक्रीसाठी या सनरुफचा वापर करतात. परंतू, नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहिलात तर तुमचा थरकाप उडणार आहे.
एक सहावी, सातवीमधला मुलगा एक्सयुव्ही थ्रीएक्सओच्या सनरुफमधून बाहेर डोकावत होता. परंतू, पुढच्या क्षणाला असे घडले की तो थेट सनरुफवरच आडवा झाला. हा व्हिडीओ प्रत्येक पालकांनी पहावा आणि शहाणे व्हावे.
कारमधून हा मुलगा जात होता. सनरुफमधून उभा राहिला होता. पुढे उंचीचे बॅरिअर होते, त्यालाच त्याचे डोके धाडकन आदळले आणि तो तसाच मागे आडवा पडला. हा जो प्रसंग आहे तो खूपच धक्क्दायक, भयावह आहे.
Next time when you leave your kids popping their heads out, think once again! pic.twitter.com/aiuHQ62XN1
— ThirdEye (@3rdEyeDude) September 7, 2025
व्हायरल व्हिडिओ @3rdEyeDude नावाच्या एका X पेजने शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.