शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:45 IST

Dhanteras Muhurt: जीएसटी कपातीनंतर दुसऱ्यांदा, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर कार खरेदीचा उत्साह दाखवला, ज्यामुळे देशातील प्रमुख ऑटो कंपन्यांच्या विक्रीने विक्रमी आकडेवारी गाठली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कार बाजार धनत्रयोदशी निमित्ताने अक्षरशः बाजार बहरून गेला आहे. जीएसटी कपातीनंतर दुसऱ्यांदा, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर कार खरेदीचा उत्साह दाखवला, ज्यामुळे देशातील प्रमुख ऑटो कंपन्यांच्या विक्रीने विक्रमी आकडेवारी गाठली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियासाठी यंदाची धनत्रयोदशी अविस्मरणीय ठरली आहे. कंपनीने एकाच दिवसात ५०,००० हून अधिक युनिट्सची विक्री करण्याचा महत्वाकांक्षी टप्पा ओलांडला आहे.

मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि विक्री) पार्थो बनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी (शनिवार) सायंकाळपर्यंत कंपनीने ३८,५०० युनिट्सची डिलिव्हरी केली होती. रात्रीपर्यंत हा आकडा ४१,००० च्या आसपास पोहोचण्याची शक्यता होती. तसेच, धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त रविवार दुपारपर्यंत असल्याने, उर्वरित १०,००० ग्राहकांना रविवारी गाड्यांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील.

मागील वर्षाचा विक्रम मोडला: गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी मारुतीने ४१,५०० युनिट्सची विक्री केली होती. यावर्षी हा आकडा ५०,००० च्या पुढे गेल्याने कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिलिव्हरी डे ठरला आहे.

सणासुदीच्या बुकिंगमध्ये वाढ: कंपनीला नवरात्रीपासून दररोज सरासरी १४,००० बुकिंग्स मिळत आहेत. १८ सप्टेंबरपासून किमती कमी केल्यानंतर (GST 2.0 मुळे), कंपनीने आतापर्यंत ४.५ लाख बुकिंग्सची नोंद केली आहे, ज्यात लहान कारसाठी ९४,००० हून अधिक बुकिंग्सचा समावेश आहे.

ह्युंदाईनेही केली दमदार कामगिरी

मारुती सुझुकीप्रमाणेच ह्युंदाई मोटर इंडियाने देखील या धनत्रयोदशीला जोरदार विक्रीची नोंद केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांनी सांगितले की, या धनत्रयोदशीला कंपनीने १४,००० युनिट्सची डिलिव्हरी करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही आकडेवारी कंपनीसाठी एक नवीन विक्रम ठरू शकते. एकंदरीत, या धनत्रयोदशीच्या खरेदीमुळे ऑटो उद्योगात उत्सवाचा उत्साह आणि बाजारात ग्राहकांचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maruti Suzuki sells 50,000 cars on Dhanteras; bookings soar.

Web Summary : Maruti Suzuki sold over 50,000 cars on Dhanteras, its highest ever. Hyundai also reported strong sales, delivering around 14,000 units. GST reductions spurred car buying, with Maruti receiving 4.5 lakh bookings since September.
टॅग्स :AutomobileवाहनDiwaliदिवाळी २०२५