Electric Scooter : लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होणार; जाणून घ्या, किती आहे किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 02:32 PM2021-10-18T14:32:50+5:302021-10-18T14:33:34+5:30

Dao EV Tec Electric Scooter : Dao 70 भारतात जानेवारी 2022 मध्ये लॉन्च केली जाऊ शकतो.

Dao EV Tec 'high-speed' electric scooter will join EV race in India next year | Electric Scooter : लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होणार; जाणून घ्या, किती आहे किंमत?

Electric Scooter : लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होणार; जाणून घ्या, किती आहे किंमत?

Next

नवी दिल्ली : भारताची इलेक्ट्रिक वाहनांचा EV बाजार सतत नवीन दिशेने आपली पावले टाकत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी सतत नवीन कंपन्यांच्या वाहनांच्या लाँचिंगच्या बातम्या घेऊन येत आहोत. दरम्यान, हैदराबादस्थित डाओ ईव्ही टेक (Dao EV Tec) कंपनी पुढील वर्षी Dao 703 हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरसोबत देशातील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये उतरण्याची योजना आखत आहे.  Dao 70 भारतात जानेवारी 2022 मध्ये लॉन्च केली जाऊ शकतो. या स्कूटरची किंमत 1.2 लाख रुपये सांगितली जात आहे, परंतु ईव्ही सबसिडीनंतर स्कूटरची किंमत 86,000 रुपये होईल. (Dao EV Tec Electric Scooter In India Next Year)

भारतात Dao 703 स्कूटरची बुकिंग सुरु झाली आहे, परंतु देशात या स्कूटरची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरू होईल. कंपनी भारतात आपले नेटवर्क स्थापन करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. Dao EV Tech कंपनी पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील 20 डीलर्ससोबत काम सुरू करण्याची योजना आखत आहे. मात्र, सुमारे दीड वर्षानंतर कंपनीचा देशभरात 300 डीलर्स स्थापन करण्याचा मानस आहे.

सिंगल चार्जमध्ये 100km धावणार
Dao 703 मध्ये  72 V BLDC मोटर मिळते, ज्याचे अधिकतम पॉवर आउटपुट 3500 W आहे. यात 72 V LFP Li-ion बॅटरी युनिट देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 100 किमी पर्यंत जाऊ शकते आणि जास्तीत जास्त 70 किमी/तासाचा वेग गाठण्यास सक्षम आहे. तसेच, काही प्रमुख फीचर्समध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टर्न सिग्नल, एलईडी टेल लाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी देण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, Dao EV Tec कंपनीने भारतातील आपल्या प्रत्येक डीलर्ससाठी 30 युनिट्सचे विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, Dao EV Tec चा अंदाजे दरवर्षी एक लाख विक्रीचा करण्याचा मानस आहे.
 

Web Title: Dao EV Tec 'high-speed' electric scooter will join EV race in India next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app