होंडाच्या कारवर हजारो रुपयांच्या ऑफर्स; जाणून घ्या सविस्तर, एका क्लिकवर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:30 IST2022-07-26T14:29:25+5:302022-07-26T14:30:20+5:30
Offers On New Cars : यामध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. या ऑफर 31 जुलैपर्यंत वैध आहेत.

होंडाच्या कारवर हजारो रुपयांच्या ऑफर्स; जाणून घ्या सविस्तर, एका क्लिकवर....
नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर कधीतरी तुमच्या मनात हे नक्कीच आले असेल की तुम्हाला कारवर चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. तसे असल्यास, आज आम्ही तुम्हाला होंडा कारबद्दल माहिती देत आहोत. होंडाच्या अनेक कारवर हजारो रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. यामध्ये Honda City, Honda Amaze आणि Honda WR-V सारख्या कारचा समावेश आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. या ऑफर 31 जुलैपर्यंत वैध आहेत.
Honda City 5th Gen आणि Honda City 4th Gen
5व्या जनरेशनच्या होंडा सिटीवर 27396 रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत. यामध्ये 5000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 5396 रुपयांपर्यंत FOC अॅक्सेसरीज मिळत आहे. याशिवाय, 5000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 7000 रुपयांचा कार एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. या कारची किंमत 11.46 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याचबरोबर चौथ्या जनरेशनच्या होंडा सिटीवर फक्त 5 हजार रुपयांची ऑफर आहे. ही ऑफर ग्राहक लॉयल्टी बोनसच्या स्वरूपात आहे. या कारची किंमत 9.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
Honda WR-V
होंडा डब्ल्यूआर-व्ही 27,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत. यामध्ये 10,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 7000 रुपयांचा कार एक्स्चेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. या कारची किंमत 9 लाख रुपयांपासून सुरू होते.
Honda Amaze
होंडा अमेझवर एकूण 8,000 रुपयांच्या ऑफर्स मिळत आहेत. यावर 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. कारची किंमत 6.56 लाख रुपयांपासून सुरू होते.
Honda Jazz
होंडा जॅझवर 25,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. 10,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 7000 रुपयांचा कार एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे. कारची किंमत 7.9 लाख रुपयांपासून सुरू होते.