क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:02 IST2025-08-12T14:00:19+5:302025-08-12T14:02:12+5:30
Citroen C3X Price, Features: सिट्रोएनने भारतीय बाजारात काही वर्षांपूर्वी पाऊल टाकले खरे परंतू काही फिचर्सच नसल्याने या कंपनीच्या कारकडे भारतीयांनी पाठच फिरविली होती. आता उशिराने का होईना सिट्रोएनला आपले नेमके काय चुकले याची प्रचिती यायला लागली आहे.

क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
फ्रान्सची कार कंपनी सिट्रोएनने भारतीय बाजारात काही वर्षांपूर्वी पाऊल टाकले खरे परंतू काही फिचर्सच नसल्याने या कंपनीच्या कारकडे भारतीयांनी पाठच फिरविली होती. आता उशिराने का होईना सिट्रोएनला आपले नेमके काय चुकले याची प्रचिती यायला लागली आहे. चार ते पाच प्रकारच्या कार असूनही या कंपनीला काही केल्या ३००-४०० चा महिना विक्रीचा आकडा पार करता येत नव्हता. आता कंपनीने १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स सिट्रॉएन सी3 या कारमध्ये आणून त्या कारला एक्स असे नाव दिले आहे.
सिट्रॉएन सी३ एक्स असे हे व्हर्जन असून या कारची एक्स शोरुम किंमत 7,90,800 रुपयांपासून ठेवण्यात आली आहे. केबिनमध्ये १०.२५-इंचाचा सिट्रोएन कनेक्ट इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), ABS + EBD, हिल होल्ड असिस्ट, टॉप टिथरसह ISOFIX चाइल्ड सीट माउंट, TPMS, हॅलो ३६०-डिग्री कॅमेरा, इंजिन इमोबिलायझर, स्पीड-सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक, हाय स्पीड अलर्ट सिस्टम आणि पेरिमेट्रिक अलार्म सारखी नवी फिचर्स देण्यात आली आहेत.
तसेच प्रॉक्सी-सेन्स PEPS आणि स्पीड लिमिटरसह क्रूझ कंट्रोल (सेगमेंट-फर्स्ट), ७ व्ह्यूइंग मोडसह HALO 360-डिग्री कॅमेरा सिस्टम, ऑटो-डिमिंग IRVM, LED व्हिजन प्रोजेक्टर हेडलाइट्स, LED प्रोजेक्टर फ्रंट फॉग लॅम्प आणि LED DRL देण्यात आले आहेत. पोलर व्हाइट, स्टील ग्रे, कॉस्मो ब्लू, पर्ला नेरा ब्लॅक आणि गार्नेट रेड हे पाच मोनोटोन कलर देण्यात आले आहेत.
C3 Live NA ची किंमत एक्सशोरुम ५.२५ लाख आहे, तर C3X Shine Turbo AT ची किंमत 9.89 लाख एवढी ठेवण्यात आली आहे.