शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

तब्बल 28 चे मायलेज, तरीही मारूती सुझुकीने बंद केली सियाझ हायब्रिड कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 10:53 AM

मारुतीने नुकतीच 1.3 लीटर डिझेल इंजिनची अर्टिगा कार बंद केली होती.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी अगदी गेल्या वर्षीपर्यंत विक्रीच्या उच्चांकांमुळे चर्चेत होती. आता विक्री घटल्यानेही चर्चेत आली आहे. मंदीमुळे जवळपास 3 हजार लोकांना कमी करणाऱ्या मारुतीने आता त्यांच्या ताफ्यातील कारची काही मॉडेलही बंद करण्यास सुरूवात केली आहे. 

मारुतीने नुकतीच 1.3 लीटर डिझेल इंजिनची अर्टिगा कार बंद केली होती. आता कंपनीने सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सियाझ कारचे हायब्रिड व्हेरिअंटच बंद केले आहे. ही कार तिच्या श्रेणीतील अन्य कंपन्यांच्या कारपेक्षा सर्वाधिक म्हणजे 28 किमीचे मायलेज देते.

मारुतीने या कारमधील 1.3 लीटरचे इंजिन हटविले आहे. आता सियाझमध्ये या इंजिनाची जागा नवे 1.5 लीटरचे इंजिन घेणार आहे. केंद्र सरकार येत्या एप्रिलपासून बीएस ६ सुरक्षा आणि इंधन प्रणाली लागू करणार आहे. यामुळे जुने 1.3 लीटरचे इंजिन यामध्ये बसत नव्हते. यामुळे पुढील काळात बलोनो, इग्निस, स्विफ्ट या कारमधील इंजिनेही बंद होणार आहेत. नवीन इंजिने परवडत नसल्याने मारुती या गाड्यांमध्ये केवळ पेट्रोल इंजिने विकणार आहे. सियाझमध्ये आता केवळ 1.5 लीटर हायब्रिड मॉडेल उपलब्ध असणार आहे. 

मारुती सुझुकीने नुकतीच नवीन लांबलचक अर्टिगा लाँच केली होती. या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसादही मिळत होता. मात्र, कंपनीने अर्टिगाचे डिझेल इंजिन प्रकाराचे मॉडेल बंद केले आहे. मारुतीने पेट्रोल, सीएनजी प्रकारासोबत डिझेलच्या दोन इंजिनांचे पर्याय लाँच केले होते. यामध्ये 1.3 लीटर आणि 1.5 लीटर इंजिन होते. भविष्यात सुरू होणाऱ्या बीएस-6 मानकांमुळे मारुतीवर बंधने आली आहेत. यामुळे ओम्नी, जिप्सीसारख्या गाड्या मारुतीला बंद कराव्या लागल्या आहेत. जिप्सी कार नव्या रुपात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी