'ही' आहे सर्वात स्वस्त फॅमिली कार, 7 लोक आरामात बसू शकतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 02:32 PM2023-04-02T14:32:11+5:302023-04-02T14:32:59+5:30

तुम्हीही कमी बजेटमध्ये चांगली फॅमिली कार शोधत असाल तर मारुती एर्टिगा (Maruti Ertiga) तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो.

cars maruti suzuki ertiga 7 seater family car under 10 lakh in india with 26 km cng mileage check price and featutres | 'ही' आहे सर्वात स्वस्त फॅमिली कार, 7 लोक आरामात बसू शकतील

'ही' आहे सर्वात स्वस्त फॅमिली कार, 7 लोक आरामात बसू शकतील

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतात पर्सनल वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्याच्या काळात लोक कुठेही ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीऐवजी स्वतःची गाडी घेऊन जाण्यास प्राधान्य देत आहेत. एकीकडे 5 सीटर एसयूव्ही वाहनांची वाढती मागणी असताना आता लोक आपल्या कुटुंबानुसार मोठी 7 सीटर कार शोधताना दिसून येत आहे. या कारमध्ये संपूर्ण कुटुंब एकाच वेळी प्रवास करू शकते. तुम्हीही कमी बजेटमध्ये चांगली फॅमिली कार शोधत असाल तर मारुती एर्टिगा (Maruti Ertiga) तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो.

भारतीय बाजारपेठेत मारुती अर्टिगाची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 12.93 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनी LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या पर्यायांसह चार मॉडेल्समध्ये कारची विक्री करते. विशेष म्हणजे टॉप 2 मॉडेल्समध्ये सीएनजी किटचा पर्यायही देण्यात आला आहे. चांगल्या मायलेजसोबतच या मॉडेल्समध्ये जबरदस्त फीचर्सही मिळतात. एर्टिगा 6 सिंगल कलरमध्ये खरेदी करता येईल, ज्यात ऑबर्न रेड, मॅग्मा ग्रे, पर्ल मेटॅलिक आर्क्टिक व्हाइट, पर्ल मेटॅलिक डिग्निटी ब्राउन, प्राइम ऑक्सफर्ड ब्लू आणि स्प्लिंडिड सिल्व्हर यांचा समावेश आहे.

शानदार आहेत फीचर्स
मारुतीच्या 7 सीटर कारला 209-लिटरची चांगली बूट स्पेस देखील मिळते, जी आवश्यक असल्यास मागील सीट खाली फोल्ड करून 550-लिटरपर्यंत वाढवता येते. कारच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, एर्टिगामध्ये MID वर TBT (टर्न-बाय-टर्न) नेव्हिगेशनसह वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. याशिवाय, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलाइट्स आणि ऑटो एसी सारखी फीचर्स देखील मिळतात.

इंजिन आणि मायलेज
7 सीटर कारमध्ये माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 103PS पॉवर आणि 137 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यामध्ये CNG पॉवरट्रेन देखील मिळते, ज्याचे आउटपुट 88 PS आणि 121.5Nm करते. तसेच, कारमध्ये पेट्रोलसह 20 किमी प्रति लिटर आणि सीएनजीसह 26 किमी प्रति किलो मायलेज देते.

Web Title: cars maruti suzuki ertiga 7 seater family car under 10 lakh in india with 26 km cng mileage check price and featutres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.