Car Tips: बसमध्ये सरळ, पण कारमध्ये तिरकी का असते विंडशील्ड? जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 16:23 IST2023-01-20T16:22:54+5:302023-01-20T16:23:48+5:30
Car Windshields: तुम्ही पाहिलं असेल बसेसमध्ये सरळ विंडशील्ड उपलब्ध असताना कारची विंडशील्ड तिरकी असते. मग असे का होते याचा कधी विचार केला आहे का?

Car Tips: बसमध्ये सरळ, पण कारमध्ये तिरकी का असते विंडशील्ड? जाणून घ्या कारण
तुम्ही पाहिलं असेल बसेसमध्ये सरळ विंडशील्ड उपलब्ध असताना कारची विंडशील्ड तिरकी असते. मग असे का होते याचा कधी विचार केला आहे का? कार उत्पादक कार्समध्ये सरळ विंडशील्ड का देत नाहीत असा विचार तुम्ही कधी केला आहे का? आपण याचबद्दल जाणून घेऊया. याचे एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर ते म्हणजे एअरोडायनॅमिक्स. कार्सना अधिक एअरोडायनॅमिक बनवण्यासाठी विंडशील्ड तिरक्या असतात. बसेसपेक्षा कार अधिक एअरोडायनॅमिक असतात.
अधिक सोप्या शब्दात सांगायचे तर, कारची विंडशील्ड तिरकी असल्याने हवा सहजरित्या कापली जाते आणि कार पुढे जात राहते. परंतु, जर विंडशील्ड पूर्णपणे सरळ असेल, तर कार पुढे जात असताना, त्यावर वाऱ्याचा अधिक जोर लागू होईल. त्यामुळे कार पुढे जाण्यात समस्या निर्माण होईल. असे झाल्यास, कार पुढे नेण्यासाठी अधिक शक्ती लागेल, ज्यामुळे इंजिनवर ताण येईल.
कारचे विंडशील्ड बसवतानाच केवळ एरोडायनॅमिक्सची काळजी घेतली जात नाही, तर संपूर्ण कारचं डिझाईन करतानाही ती घेतली जाते. ज्या कार्सचा वेग जास्त असतो, त्यांचं इंजिनही शक्तिशाली असतं. यासोबतच त्यांचं एअरोडायनॅमिक्स अधिक चांगलं असतं.
लॅमिनेटेड अँड टेम्पर्ड विंडशील्ड
विंडशील्ड साधारणपणे दोन प्रकारचे असतात, लॅमिनेटेड आणि टेम्पर्ड. लॅमिनेटेड विंडशील्ड हे टेम्पर्ड विंडशील्डपेक्षा चांगले मानले जाते. कारण ते बनवण्यासाठी दोन ग्लास वापरले जातात आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक असते, त्यामुळे अपघात झाल्यास ते सहजपणे तुटत नाही.