Car Sales: या एकट्या SUVनं कंपनीचं नशीबच बदललं, विक्रीत थेट 75 टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 18:51 IST2023-03-01T18:49:02+5:302023-03-01T18:51:23+5:30
या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीत वाढ होण्याचे कारण म्हणजे एसयूव्ही.

Car Sales: या एकट्या SUVनं कंपनीचं नशीबच बदललं, विक्रीत थेट 75 टक्क्यांची वाढ
भारतात एसयूव्ही कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. आता लोक छोट्या आणि किफायतशीर कारऐवजी मोठ्या आणि दमदार एसयूव्ही कार खरेदी करण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे, अनेक कंपन्यांसाठी तर या एसयूव्ही कार वरदान ठरत आहेत. टोयोटा आणि ह्युंदाई अशाच दोन कंपन्या. फेब्रुवारी महिन्यात टोयोटाच्या विक्रीत 75 टक्क्यांनी वाढ झाली, तर ह्युंदाईच्या विक्रीतही 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीत वाढ होण्याचे कारण म्हणजे एसयूव्ही.
Toyota Sales -
टोयोटा किर्लोस्कर मोटरने (TKM) बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांची ठोक विक्री 75 टक्क्यांनी वाढली असून (वार्षिक आधारावर) 15,338 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात टोयोटाने 8,745 युनिट्सची विक्री केली होती. 'आमच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओकडे ग्राह सातत्याने आकर्षित होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. यामुळे फेब्रुवारी 2023 मध्ये अत्यंत चांगली ग्रोथ झाली आहे,' असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच या ग्रोथमध्ये अर्बन क्रुझर हायरायडर आणि नव्या इनोव्हा हायक्रॉसची मुख्य भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Hyudai Sales -
ह्युंदाई मोटर इंडियाची वार्षिक आधारे फेब्रुवारी महिन्यातील ठोक विक्री 9 टक्क्यांनी वाढून 57,851 युनिटवर पोहोचली आहे. ह्युंदाईच्या विक्रीत सर्वाधिक योगदान Hyundai Creta चे आहे. कंपनीने बुधवारी फेब्रुवारी, 2023 मधील आकडे जारी करत म्हटले आहे की, एक वर्षापूर्वीच्या सेम महिन्यात त्यांनी एकूण 53,159 वाहनांची ठोक विक्री केली होती.
गेल्या महिन्यात ह्युंदाईने 47,001 युनिट वाहनांची देशांतर्गत बाजारात विक्री केली होती. जी फेब्रुवारी 2022 च्या 44,050 युनिट्सच्या तुलनेत 7 टक्के अधिक होती. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, फेब्रुवारी, 2023 मध्ये भारताने 10,850 वाहनांची निर्यातही केली. जी एक वर्षांपूर्वीच्या 9,109 वाहनांच्या तुलनेत 19 टक्के अधिक आहे.