Car, Bike Price Hike: १ एप्रिलपासून डिझेलवर संकट, कार-दुचाकी महागणार; कंपन्यांकडून जोरदार झटका देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:30 AM2023-03-14T11:30:02+5:302023-03-14T11:33:13+5:30

काही कंपन्या मार्च एंडिंगला आणि काह कंपन्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कार आणि दुचाकींच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढविणार आहेत.

Car, Bike Price Hike: Crisis on diesel from April 1, car-two-wheelers will become expensive; Preparations from companies BS 6 II | Car, Bike Price Hike: १ एप्रिलपासून डिझेलवर संकट, कार-दुचाकी महागणार; कंपन्यांकडून जोरदार झटका देण्याची तयारी

Car, Bike Price Hike: १ एप्रिलपासून डिझेलवर संकट, कार-दुचाकी महागणार; कंपन्यांकडून जोरदार झटका देण्याची तयारी

googlenewsNext

जर तुम्ही कार, दुचाकी खरेदी करत असाल तर इकडे लक्ष द्या. मार्च एंड आणि एप्रिल तुम्हाला जोरदार धक्का देणारा ठरणार आहे. काही कंपन्या मार्च एंडिंगला आणि काह कंपन्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कार आणि दुचाकींच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढविणार आहेत. सरकारची पॉलिसी यासाठी कारणीभूत ठरणार असून एप्रिलपासून कार ५० हजारांपर्यंत महागण्याची शक्यता आहे. 

सरकारने कार कंपन्यांना १ एप्रिलपासून बीएस 6-II उत्सर्जन लागू करण्यास सांगितले आहे. नवीन उपकरण आणि सॉफ्टवेअरसाठी जो खर्च येणार आहे, तो कंपन्या ग्राहकांवर टाकणार आहेत. नव्या मानकांनुसार कार आणि बाईक्स उत्पादन केल्यानंतर वाहनांमध्ये कॅटॅलिक कर्न्व्हर्टर, ऑक्सिजन सेंसर सारखी उपकरणे लावावी लागणार आहेत. तसेच इंधन वापराला नियंत्रित करण्यासाठी प्रोग्राम्ड इंजेक्टर देखील वापरावा लागणार आहे. हे उपकरण पेट्रोल इंजिनात पाठविले जाणारे इंधन आणि त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणार आहे. याचबरोबर वाहनांमधील चिपही अपग्रेड करावी लागणार आहे. 

यामुळे कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. हा वाढलेला उत्पादन खर्च कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार आहेत. १ एप्रिल २०२० पासून बीएस 6-I उत्सर्जन मानक लागू करण्यात आले होते. तेव्हा सर्व कारची किंमत ५० हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 

एका माहितीनुसार कारची किंमत १५ ते ५० हजार रुपये मॉडेलनुसार वाढेल, तर दुचाकींची किंमत १० टक्क्यांनी वाढणार आहे. ट्रक, टेम्पोसारख्या वाहनांमध्ये देखील ५ टक्क्यांनी दरवाढ दिसू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. 
 

Web Title: Car, Bike Price Hike: Crisis on diesel from April 1, car-two-wheelers will become expensive; Preparations from companies BS 6 II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.