इथेनॉलवरही चालणार, USB पोर्टही; हीरोनं लाँच केली स्वस्त आणि जबरदस्त मायलेज देणारी बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 02:57 PM2023-06-09T14:57:26+5:302023-06-09T14:58:33+5:30

हीरो मोटोकॉर्पनं अधिकृतरित्या आपली ही बाईक पुन्हा एकदा लाँच केली आहे. ही बाईक इथेनॉलवरही चालवता येईल.

Can also run on ethanol USB port Hero has launched an affordable and great mileage bike know details | इथेनॉलवरही चालणार, USB पोर्टही; हीरोनं लाँच केली स्वस्त आणि जबरदस्त मायलेज देणारी बाईक

इथेनॉलवरही चालणार, USB पोर्टही; हीरोनं लाँच केली स्वस्त आणि जबरदस्त मायलेज देणारी बाईक

googlenewsNext

भारतातील आघाडीची दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पनं अधिकृतपणे आपली बाईक पॅशन प्लस पुन्हा लाँच केली. हीरो मोटोकॉर्पनं (Hero MotoCorp) तीन वर्षांपूर्वी BS6 नियम लागू झाल्यानंतर पॅशन प्लस बंद केली होती. ही भारतीय बाजारपेठेतील अतिशय लोकप्रिय बाइक्सपैकी एक आहे. हेच कारण आहे की इतक्या दिवसांनंतर कंपनीने आता पुन्हा एकदा अपडेट करून ग्राहकांसाठी ही बाईक लाँच केलीये. पाहूया या बाईकचे काही खास फीचर्स.

पॅशन प्लस हे हीरोच्या लाइन-अपमधील पाचवे मॉडेल आहे जे एअर-कूल्ड 97.2cc सिंगल-सिलिंडर 'स्लोपर' मिलचा वापर करते. हे 8hp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. हेच इंजिन पॉवरट्रेन HF आणि Splendor मध्ये देखील वापरण्यात येत आहे. हे इंजिन आता OBD-2 नुसार आणि E20 इंधनावर (20% इथेनॉल असलेलं पेट्रोल) चालण्यास सक्षम असेल. बाइक i3s स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे.

आणखी कोणती फीचर्स?
बाइकला टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक एब्झॉर्बर देण्यात आले आहेत. यात डबल क्रेडल फ्रेम आहे. 115 किलो वजनासह, ही हीरोची सर्वात वजनदार 100cc बाईक आहे. पॅशन प्लस ट्यूबलेस टायर्ससह अलॉय व्हीलसह येते. रिटर्निंग पॅशन प्लस 3 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. यात सेल्फ स्टार्ट, डिजी-अ‍ॅनालॉग डिस्प्ले आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील मिळतो.

किती आहे किंमत?
या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीनं याची किंमत 76,065 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी ठेवी आहे. हीरो 100cc मॉडेल्समध्ये पॅशन प्लस ही सर्वात महागडी बाईक आहे.

Web Title: Can also run on ethanol USB port Hero has launched an affordable and great mileage bike know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.