650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 20:25 IST2025-04-29T20:25:04+5:302025-04-29T20:25:36+5:30
BYD Seal Electric Car: चीनी कार उत्पादक कंपनी BYD ने भारतात आपली नवीन 2025 Seal EV लॉन्च केली आहे.

650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
BYD Launched Seal Electric Car: चिनी ऑटोमोबाईल कंपनी BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) ने भारतीय बाजारात त्यांची नवीन इलेक्ट्रिक सेडान सील (Seal Electric Car) लॉन्च केली आहे. याची सुरुवातीची किंमत 41 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने यात अनेक अपग्रेड्स दिले आहेत. या कारची उत्कृष्ट रेंज, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि जास्त काळ चालणारी बॅटरी, हे फिचर्स या कारला इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा वेगळी बनवतात.
बॅटरी, चार्जिंग आणि रेंज
बीवायडी सीलमध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट (एलएफपी) बॅटरी आहे, जी 15 वर्षांचे आयुष्य देते. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 650 किमीची रेंज देते. तसेच, डीसी फास्ट चार्जरसह कारला फक्त 15 मिनिटांत 200 किमी प्रवास करण्याइतके चार्ज करता येते. तर, 80% चार्ज होण्यासाठी फक्त 45 मिनिटे लागतात.
आलिशान केबिन
BYD सीलचा आतील भाग अतिशय प्रीमियम आणि आधुनिक आहे. यात 15.6 इंचाची टचस्क्रीन आहे. यासोबतच 10.25 इंचाचा फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळेल. ही कार क्रिस्टल गिअरशिफ्ट, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले (HUD) आणि फुल मेटल बॉडीने सुसज्ज आहे, ज्यामुळे ती आणखी खास बनते. BYD सीलला वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट मिळतो.
कारचे परिमाण आणि स्टोरेज
BYD सीलची लांबी 4800 मिमी, रुंदी 1875 मिमी आणि उंची 1460 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 2920 मिमी आहे, तर कारचा ग्राउंड क्लिअरन्स 149 मिमी आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, यात 53 लिटर फ्रंट ट्रंक स्पेस आणि 400 लिटर बूट स्पेस आहे.
BYD सील व्हेरिएंट अन् किंमत
कंपनीने BYD सील तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. त्याचा पहिला प्रकार डायनॅमिक आरडब्ल्यूडी आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 41 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरा प्रकार प्रीमियम RWD आहे, ज्याची किंमत 45.70 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंट परफॉर्मन्स AWD ची किंमत 53.15 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे सर्व प्रकार त्यांच्या बॅटरी क्षमता, ड्रायव्हिंग रेंज आणि तंत्रज्ञान वैशिष्ट्यांवर आधारित आहेत.