शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आता पस्तावतेय बुलेट राणी! स्टंट करणे पडले भारी; Video व्हायरल होताच पावत्या आल्या 39 हजारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 13:47 IST

Stunt lady Bullet Rani in Trouble: 21 वर्षीय शिवांगीचे खूपसारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे ती देशभरात बुलेट राणी म्हणून फेमस झाली. आता या व्हिडीओवर पोलिसांची नजर पडली आणि पोलिसांनी थेट तिच्या घरी हजारो रुपयांच्या पावत्या पाठविल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या सुरतमध्ये एका कॉलेज तरुणीला सुपरफास्ट बाईकवरून स्टंट करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने बेड्या पडल्य़ा असताना आता नवीन बुलेटलेडी चर्चेत आली आहे. उत्तरप्रदेशच्या गाझियाबादची ही तरुणी असून तिचे नाव शिवांगी डबास आहे. तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती अडचणीत आली आहे. (Bullet Rani gets 39000 rs challans by Gaziabad Police after bike stunts goes Viral.)

सुरतेची कॉलेज तरुणी; Video व्हायरल होताच पडल्या बेड्या

21 वर्षीय शिवांगीचे खूपसारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे ती देशभरात बुलेट राणी म्हणून फेमस झाली. आता या व्हिडीओवर पोलिसांची नजर पडली आणि पोलिसांनी थेट तिच्या घरी हजारो रुपयांच्या पावत्या पाठविल्या आहेत. 

यामध्ये सैन्यातील जवान काही औचित्य असेल तर जसे बुलेटवर एकावरएक असे उभे राहून शौर्य दाखवतात तसाच व्हिडीओ या शिवांगीने काढला आहे. या व्हिडीओत शिवांगी दुसऱ्या एका बुलेट राणीच्या खांद्यावर बसली आहे, ही दुसरी तरुणी बुलेट चालवत आहे. असा जिवघेणा स्टंट केल्यानेच गाझियाबाद पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी शिवांगीला 39 हजार रुपयांच्या तीन पावत्या पाठविल्या आहेत. 

धक्कादायक बाब म्हणजे शिवांगीने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून पोलिसांना कृपया एवढ्या दंडाच्या पावत्या पाठवू नका असे आवाहन केले आहेत. त्यांनी यामध्ये 11 हजार रुपयांच्या दंडाच्या दोन पावत्या आल्याचे सांगितले. एकूण त्यांच्या घरी 39 हजार रुपयांच्या पावत्या पाठविण्यात आल्या आहेत. तसेच आता उपरती सुचल्यानंतर त्यांनी लोकांना हेल्मेट घालून दुचाकी चालविण्याचे आवाहन केले आहे. शिवांगीने सांगितले की, बुलेट चालविणे तिची आवड आहे आणि हा स्टंट तिने प्रॅक्टिससाठी केला आहे. 

शिवांगी आणखी एका मोठ्या प्रकरणात सापडण्याची शक्यता आहे. ती एका एसयुव्ही कारच्या सनरुफमधून बाहेर बंदूक घेऊन उभी आहे. या व्हिडीओची देखील चौकशी आता पोलीस करत आहेत. आता बाकी काहीही असो, ही प्रसिद्ध झालेली बुलेटराणी केलेल्या पराक्रमांवरून पस्तावत आहे.   
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसbikeबाईक