Corbett EV : एकदा चार्ज केल्यानंतर धावणार 200 किमी, Boom Motors ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 10:41 IST2021-11-12T10:40:39+5:302021-11-12T10:41:09+5:30
Boom Corbett EV launched in India: कंपनी आजपासून म्हणजेच 12 नोव्हेंबर 2021 पासून नवीन कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग सुरू करणार आहे.

Corbett EV : एकदा चार्ज केल्यानंतर धावणार 200 किमी, Boom Motors ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच
नवी दिल्ली : बूम मोटर्सने देशात नवीन कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटर (EV) लाँच केली आहे, जी भारतातील सर्वात टिकाऊ स्कूटर असल्याचा दावा केला जात आहे. कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरची किंमत 89,999 रुपये ठेवली आहे. तसेच, ही स्कूटर बाजारात इतर बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरला टक्कर देणार आहे.
कंपनी आजपासून म्हणजेच 12 नोव्हेंबर 2021 पासून नवीन कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग सुरू करणार आहे. कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरला 2.3 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यानंततर 200 किमीपर्यंत धावू शकते. या बॅटरीला दुप्पट करून 4.6 kWh करण्याच्या पर्याय ग्राहकांना देण्यात आला आहे.
कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिटेचेबल बॅटरी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीचा दावा आहे की, या स्कूटरचा चार्जर घरातील कोणत्याही सॉकेटवर लावला जाऊ शकतो. ही नवीन स्कूटर ताशी 75 किमी वेगाने चालवता येते. कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल असाही दावा केला जात आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर 5 वर्षांच्या EMI सह खरेदी केली जाऊ शकते.
कंपनीचे म्हणणे आहे की, कॉर्बेटइलेक्ट्रिक स्कूटर केवळ 1,699 रुपये प्रति महिना EMI सह खरेदी केली जाऊ शकते. बूम मोटर्स या स्कूटरच्या चेसीवर 7 वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटी देत आहे. बूम मोटर्सचे सीईओ अनिरुद्ध रवी नारायणन म्हणाले की, "हवामानातील बदल हे सध्या आपल्या सर्वांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे आणि भारतातील प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेल्या ‘वाहनांच्या प्रदूषणावर’ मात करणे हे आमचे ध्येय बनले आहे."
बूम मोटर्सबद्दल अनिरुद्ध रवी नारायणन म्हणाले, "गेल्या 2 वर्षांपासून बूम मोटर्सची संपूर्ण टीम सातत्याने काम करत आहे, त्यामुळे हे वाहन विक्रमी वेळेत बाजारात दाखल झाले आहे. आम्ही कोईम्बतूर येथे उत्पादन प्रकल्प उघडला आहे ज्याची क्षमता वार्षिक 1 लाख स्कूटक तयार करण्याची क्षमता आहे. आम्ही या प्लांटमध्ये शेकडो लोकांना रोजगारही दिला आहे."