Kartik Aaryan : कार्तिक आर्यनला ४.७ कोटींची McLaren GT मिळाली गिफ्ट, टेक्नॉलॉजी, फीचर्स पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 19:58 IST2022-06-24T19:57:04+5:302022-06-24T19:58:08+5:30

Kartik Aaryan McLaren GT Price: McLaren GT हे कोणत्याही सामान्य कारचं नाव नसून ती एक सुपर कार आहे. कार्तिक आर्यनला ही कार गिफ्ट मिळाली असून या कारचा भारतातील तो पहिलाच मालक आहे.

bollywood actor kartik aaryan mclaren gt price 4.7 crore in india bhool bhulaiyaa 2 success t series bhushan kumar gifted | Kartik Aaryan : कार्तिक आर्यनला ४.७ कोटींची McLaren GT मिळाली गिफ्ट, टेक्नॉलॉजी, फीचर्स पाहून व्हाल अवाक्

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनला ४.७ कोटींची McLaren GT मिळाली गिफ्ट, टेक्नॉलॉजी, फीचर्स पाहून व्हाल अवाक्

Kartik Aaryan McLaren GT Price: बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यनला McLaren GT ही कार गिफ्ट म्हणून मिळाली. बॉलिवूडच्या कोणत्याही कलाकाराला गिफ्टमध्ये कार मिळणं ही कोणती मोठी बाब नाही. परंतु McLaren GT ही कार मिळणं ही मोठी बाब आहे. इतकंच नाही तर McLaren GT असलेला कार्तिक आर्यन पहिलाच व्यक्ती ठरला आहे.

यापूर्वी भारतात ही कार कोणाकडेच नव्हती. त्याला भूल भुलैया २ च्या यशासाठी ही कार गिफ्ट करण्यात आली. टी सीरिजचे चेअरपर्सन आणि प्रोड्युसर भूषण कुमार यांनी त्याला ही कार गिफ्ट केली. दोघांनीही या स्पोर्टी कार समोर पोझ देत फोटो शेअर केले आहेत. McLaren GT ही कार नाही, तर सुपर कार आहे. यात मिळणारे फीचर्स आणि टेक्नॉलॉजी या कारला खास बनवते.

भारतात या कारची एक्स शोरूम किंमत ४.७ कोटी रूपये आहे. कंपनीची भारतात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कार आहे. ही एक टू सीटर कार असून ती एअरडायनॅमस्कसोबत येते. यात ४.० लिटरचं twin-turbocharged V8 इंजिन देण्यात आलं आहे. ही कार ६१२ एचीपीची पॉवर आणि  ६३० एनएमचा टॉर्क जनरेट करते. या इंजिनच्या मदतीनं केवळ ३.२ सेकंदात ६२ मैल प्रति तासाचा वेग पकडता येतो. ही कार २०३ मैल प्रति तास या वेगानं धावू शकते. यामध्ये एलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सिस्टम देण्यात आलंय. याशिवाय यात उत्तम ब्रेकिंग सिस्टमही देण्यात आलं आहे.

आणखी कोणते फीचर्स?
या कारमध्ये ७ इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे. हा उत्तम ग्राफिक्स आणि एम्बिअंट लाईटसोबत येतो. या कारमध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, सॅटलाईन नेव्हिगेशन, एसी आणि मीडिया स्ट्रीमिंगतं कंट्रोल देण्यात आलं आहे. याशिवाय कारमध्ये इलेक्ट्रोक्रोमिक पॅनारोमिक सनरुफ देण्यात आलं आहे आणि ५ लेव्हल पर्यंत एक बटनानं कंट्रोल केलं जाऊ शकतं.

Web Title: bollywood actor kartik aaryan mclaren gt price 4.7 crore in india bhool bhulaiyaa 2 success t series bhushan kumar gifted