दरवर्षी दिवाळीनिमित्त लोक नवीन वस्तू खरेदी करतात. यामध्ये अनेकजण वाहनांच्या खरेदीस प्राधान्य देतात. तुम्हीही या दिवाळीत स्वतःसाठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. सध्या भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या काही लोकप्रिय सेडान कार्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात आहेत. काही मॉडेल्सवर तर ₹2 लाखांहून अधिक सवलत मिळत आहे.
स्कोडा स्लाविया
या सणासुदीच्या काळात स्कोडा स्लाविया सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. ग्राहकांना या कारवर ₹2.25 लाखांपर्यंतची सवलत मिळत आहे. तिचे आकर्षक डिझाइन, दमदार टर्बोचार्ज्ड इंजिन आणि उत्कृष्ट रेंजमुळे या कारची खूप मागणी आहे. याच बरोबर, व्होक्सवॅगन व्हर्टस देखील मागे नाही. या कारवर ₹1.5 लाखांपर्यंतचा लाभ मिळतोय.
दोन्ही या कार्स एकाच MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत आणि त्यांच्यात बऱ्याच वैशिष्ट्यांमध्ये साम्य आहे. या ऑफर्स प्रामुख्याने त्यांच्या 1.5 लिटर पेट्रोल व्हेरिएंट्स वर लागू आहेत. परफॉर्मन्स आणि कम्फर्ट शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते.
होंडा सिटी
होंडा सिटी सेडानदेखील या सणासुदीच्या काळात चांगली विक्री होत आहे. कंपनी या कारवर ₹1.27 लाखांपर्यंतची सवलत देत आहे.अलीकडे तिच्या विक्रीत थोडी घट झाली असली, तरी सिटीने अनेक वर्षांपासून मिड-साइज सेगमेंटमध्ये बेंचमार्क निर्माण केला आहे. ही कार पेट्रोल आणि हायब्रिड पॉवरट्रेन या दोन पर्यायांत उपलब्ध आहे. त्यासोबत मिळणाऱ्या आकर्षक फायनान्सिंग स्कीम्समुळे सिटी अजूनही ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरते.
होंडा अमेझ
छोटी पण परफॉर्मन्स आणि कम्फर्टमध्ये दमदार कार शोधणाऱ्यांसाठी होंडा अमेझ योग्य पर्याय ठरू शकते. सध्या या कारवर ₹98,000 पर्यंतची बचत मिळत आहे. तिचा कॉम्पॅक्ट आकार, विश्वासार्ह इंजिन आणि आकर्षक इंटीरियर यामुळे ती व्यक्तिगत आणि टॅक्सी दोन्ही वापरासाठी लोकप्रिय आहे.
हुंडई ऑरा आणि टाटा टिगोर
बजेट सेगमेंटमधील खरेदीदारांसाठी हुंडई ऑरा आणि टाटा टिगोर दोन्ही उत्तम ऑफर्ससह येत आहेत. हुंडई ऑरा वर ₹43,000 पर्यंतची सवलत आणि टाटा टिगोर वर ₹30,000 पर्यंतचे फायदे मिळत आहेत. दोन्ही सेडान्समध्ये शहरी वापरासाठी आवश्यक फीचर्स दिले गेले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने मिळणाऱ्या या सवलतींमुळे या दोन्ही कार्स बजेट-फ्रेंडली आणि प्रॅक्टिकल पर्याय ठरतात.
एकंदरीत, या दिवाळीत भारतीय कार बाजारात स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. विविध ब्रँड्सच्या आकर्षक सवलती आणि फायनान्सिंग योजनांमुळे ग्राहकांना परफॉर्मन्स, कम्फर्ट आणि किफायतशीर किंमत या तिन्हींचा समतोल साधण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
Web Summary : Diwali brings huge car discounts! Skoda Slavia leads with ₹2.25 lakh off. Honda City offers ₹1.27 lakh discount. Other models like Amaze, Aura and Tigor provide budget-friendly options, making this festive season a golden opportunity for buyers.
Web Summary : दिवाली पर कारों पर भारी छूट! स्कोडा स्लाविया पर ₹2.25 लाख तक की छूट। होंडा सिटी पर ₹1.27 लाख की छूट। अन्य मॉडल जैसे अमेज, ऑरा और टिगोर बजट के अनुकूल विकल्प, यह त्योहारी सीजन खरीदारों के लिए सुनहरा अवसर है।