शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 08:13 IST

NHAI FASTag New Rules: १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन फास्टॅगसाठी KYV अनिवार्य नसेल. जुन्या युझर्सनाही मोठा दिलासा. वाचा सविस्तर माहिती.

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  देशभरातील लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन फास्टॅग घेण्यासाठी आता अनिवार्य असलेली 'KYV' (Know Your Vehicle) प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२६ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नवीन फास्टॅग घेताना किंवा सक्रिय करताना वाहनधारकांना होणारा मनस्ताप आता थांबणार आहे.

नेमका बदल काय?यापूर्वी, कार, जीप किंवा व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेताना 'नो युअर व्हेईकल' (KYV) ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. कागदपत्रे वैध असूनही अनेकदा या प्रक्रियेमुळे टॅग सक्रिय होण्यास उशीर व्हायचा. आता NHAI ने ही प्रक्रियाच रद्द केली आहे.

जुन्या फास्टॅग धारकांचे काय?ज्यांच्याकडे आधीच फास्टॅग आहे, त्यांनाही आता नियमितपणे KYV करण्याची गरज उरणार नाही. फक्त खालील काही विशेष प्रकरणांतच याची गरज भासू शकते:

फास्टॅगचा चुकीचा वापर होत असल्याची तक्रार आल्यास.

टॅग चिकटवलेला नसल्यास किंवा तांत्रिक बिघाड असल्यास.

चुकीच्या पद्धतीने टॅग जारी केला गेला असल्यास.

आता बँक कशी करणार व्हेरिफिकेशन?प्रक्रिया सोपी केली असली तरी सुरक्षेसाठी NHAI ने बँकांसाठी नियम कडक केले आहेत. आता फास्टॅग सक्रिय करण्यापूर्वी बँकांना 'वाहन' (VAHAN) डेटाबेसवरून वाहनाची माहिती पडताळणे अनिवार्य असेल. जर माहिती डेटाबेसमध्ये नसेल, तरच आरसी (RC) बुकद्वारे पडताळणी केली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Fastag Users Get New Year Gift: 'KYV' Rule Ends!

Web Summary : NHAI ends mandatory 'KYV' for new Fastags from February 1, 2026, easing activation. Banks must verify vehicle data via VAHAN database for security. Existing users need KYV only for misuse or technical issues.
टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाका