शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Tata च्या EV गाड्यांवर मोठी सवलत; टियागो, पंच, नेक्सनवर होईल ₹3.80 लाखांची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:40 IST

कोणत्या कारवर किती डिस्काउंट? जाणून घ्या...

Tata EV Discount: भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने मार्च महिन्यासाठी आपल्या इलेक्ट्रिक कार्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्स कंपनीच्या भारतातील संपूर्ण ईव्ही (EV) रेंजवर लागू आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्यातही कंपनीने सवलती जाहीर केल्या होत्या, मात्र मार्चमध्ये त्या अधिक वाढवण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सच्या माहितीनुसार, 2024 आणि 2025 मध्ये तयार झालेल्या जुन्या स्टॉकवरील वाहनांवर ग्राहकांना जास्त सवलत आणि बोनस दिले जात आहेत. काही मॉडेल आणि व्हेरिएंटवर ग्राहकांना तब्बल 3.80 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. मात्र ही सवलत कारच्या मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असू शकते. एकंदरीत, टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी मार्च महिना फायदेशीर ठरू शकतो.

टाटा टियागो ईव्हीवर आकर्षक ऑफर्स

टाटा मोटर्सची सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कार मानली जाणारी टाटा टियागो ईव्ही या महिन्यात विविध ऑफर्ससह उपलब्ध आहे. MY26 XT व्हेरिएंटवर ग्राहकांना सुमारे 90,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तर, टेक लक्स आणि हाय-स्पेक XZ+ ट्रिम्सवर सुमारे 1.20 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.

जुन्या मॉडेल्सवर अधिक सवलत 

MY24 आणि MY25 टियागो ईव्ही XT मॉडेलवर सुमारे 1.80 लाख रुपयांपर्यंत फायदा दिला जातोय. तर, XZ+ व्हेरिएंटवर सुमारे 2.10 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. या ऑफर्समध्ये एक्सचेंज आणि स्क्रॅपेज इन्सेंटिव्ह देखील समाविष्ट आहेत.

टाटा पंच ईव्हीवरही मोठी सवलत

कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून लोकप्रिय झालेल्या टाटा पंच ईव्हीवरही कंपनीने किंमतीत कपात केली आहे. स्मार्ट एंट्री-लेव्हल व्हेरिएंटवर सुमारे 90,000 रुपयांपर्यंत सवलत मिळतेय, तर इतर व्हेरिएंटवर 1.20 लाख रुपयांपर्यंत सवलत उपलब्ध आहे. पंच ईव्हीच्या लाँग रेंज व्हर्जनवर ग्राहकांना 1.40 लाख रुपयांपर्यंत एकूण बचत मिळू शकते.

टाटा नेक्सन ईव्हीवर विशेष लाभ

भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात लोकप्रिय असलेल्या टाटा नेक्सन ईव्हीवरही मार्चमध्ये खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. MY24 आणि MY25 नेक्सन ईव्ही 3.0 मॉडेलवर संपूर्ण रेंजवर 1.20 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जातेय, तर MY26 व्हेरिएंटवर सुमारे 50,000 रुपयांपर्यंत लाभ मिळतोय. या ऑफर्समध्ये एक्सचेंज आणि स्क्रॅपेज लाभ, ग्रीन बोनस आणि टाटा ब्रँड लॉयल्टी इन्सेंटिव्ह यांचा समावेश आहे.

टाटा कर्व्ह ईव्हीवर सर्वाधिक सवलत

अलीकडेच लॉन्च झालेल्या टाटा कर्व्ह ईव्हीलाही मार्च सवलत योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. MY26 Creative 45 व्हेरिएंटवर सुमारे 2.80 लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे, तर इतर व्हेरिएंटवर 3.30 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. विशेष म्हणजे, MY24 आणि MY25 कर्व्ह ईव्हीवर सुमारे 3.30 ते 3.80 लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. 

टाटा हॅरियर ईव्हीवरही ऑफर

टाटा मोटर्सने टाटा हॅरियर ईव्हीच्या सर्व व्हेरिएंटवर 1.50 लाख रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. मोठ्या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या शोधात असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata EV Discounts: Tiago, Punch, Nexon Get Up to ₹3.8 Lakh Off

Web Summary : Tata Motors offers significant discounts on its EV range this March, with up to ₹3.8 lakh off older stock. Offers vary by model and variant, including Tiago EV, Punch EV, Nexon EV, Curve EV and Harrier EV, making it a great time for EV buyers.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन