शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

बजाजची Urbanite चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आहे खास, जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 7:11 PM

बजाज ऑटोनं नवी आयकॉनिक चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर एका प्रदर्शनात ठेवली आहे.

नवी दिल्लीः बजाज ऑटोनं नवी आयकॉनिक चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर एका प्रदर्शनात ठेवली आहे. बजाजनं नवी दिल्ली आयोजित एका कार्यक्रमात या स्कूटरची झलक दाखवली. चेतक ही बजाजची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारी 2020मध्ये लाँच होणार असून, त्यावेळीच कंपनी या स्कूटरची किंमत निश्चित करणार आहे. भारतीय बाजारात बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा Ather 450 आणि Okinawa Praise यांच्याशी थेट मुकाबला आहे.  बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर इको मोडवर 95 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. तसेच स्पोर्ट मोडवर स्कूटर 85 किलोमीटरपर्यंत धावणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये प्रीमियम फीचर्सही देण्यात आले आहेत. बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णतः डिजिटल यंत्रणेनं सुसज्ज आहे. तसेच या स्कूटरला मोटारसायकलसारखी फॉब लाइटही दिली आहे. या स्कूटरमध्ये की-लेस इग्निशन बसवण्यात आलं असून, ते ऍपच्या माध्यमातून जोडण्यात आलं आहे. स्कूटरच्या फ्रंट हेडलॅप्सच्या जवळ एक ओव्हल LED स्ट्रिप देण्यात आली आहे. तसेच या स्कूटरमध्ये सहा रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांतसुद्धा सहभागी झाले होते. बजाजच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचं प्रॉडक्शन कंपनीनं चाकणच्या कारखान्यात केलं आहे. चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फिक्स्ड केलेली बॅटरी देण्यात आली आहे. तसेच बजाजच्या चेतकमध्ये Li-Ion बॅटरी देण्यात आली असून,  5-15 ampच्या चार्जरनं ती चार्ज करता येणार आहे. तर इतर जण चार्जिंग स्टेशनवरूनही ती बॅटरी चार्ज करू शकतात. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइल