शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

अवघ्या 1 लाखात बजाजची इलेक्ट्रीक पल्सर; जुन्या मोटारसायकलचे रुपांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 8:17 PM

काही स्टार्टअपनी इलेक्ट्रीक बाईकही लाँच केली आहे. भारतात आधीच Ultraviolette F77 ही बाईक लाँच झालेली आहे.

बजाज या पुण्यात पसारा असलेल्या कंपनीने नुकतीच इलेक्ट्रीक स्कूटर चेतक लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे. मात्र, पल्सरही इलेक्ट्रीक मिळाली तर. ती ही एक लाखात. होय एका अवलियाने जुनी पल्सर इलेक्ट्रीकमध्ये बदलली आहे. 

काही स्टार्टअपनी इलेक्ट्रीक बाईकही लाँच केली आहे. भारतात आधीच Ultraviolette F77 ही बाईक लाँच झालेली आहे. मात्र, अन्य कंपन्यांची बाईक अद्याप आलेली नाही. सारे इलेक्ट्रीक स्कूटरमध्येच लक्ष देत आहेत. मात्र, बेंगळुरूच्या एका तरुणाने त्याची 150 सीसीची पेट्रोल इंजिनवाली पल्सर इलेक्ट्रीक केली आहे. Barrel Electric या स्टार्टअप कंपनीने ही बाईक बनविली आहे. सध्या ही बाईक 90 किमी प्रती तासाच्या वेगाने धावू शकते. त्यांना ही बाईक तब्बल 300 किमीच्या वेगाने पळण्यासाठी सक्षम करायची आहे. 

Barrel Exhaust चे कार्यकारी अधिकारी गिरिधर सुंदरराजन यांनी या इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर केलेल्या पल्सरचे रोड टेस्ट रिपोर्ट जाहीर केले आहेत. ही मोटारसायकल त्यांच्याच मालकीची आहे. त्यांनी काही वर्षे वापरल्यानंतर या बाईकला नवीन आयुष्य दिले आहे. यासाठी त्यांना 1 लाखांचा खर्च आला आहे. 

या पल्सरची इंधन टाकीच त्यांनी काढून टाकली आहे. यामुळे पाहताना ही बाईक काहीशी विचित्र वाटते. एका चार्जिंगमध्ये ही कार 80 किमी अंतर कापते. तर इकॉनॉमी मोडवर 100 किमी धावू शकते. ली आयनची बॅटरी एका चार्जिंगसाठी अडीच तासांचा वेळ घेते. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन