Auto Expo 2023 : एमजीनं उतरवल्या एका पेक्षा एक सरस इलेक्ट्रीक कार्स, फोटो पाहून म्हणाल व्हॉव…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 16:25 IST2023-01-11T16:24:41+5:302023-01-11T16:25:28+5:30
ऑटो एक्सपो 2023 मध्ये एमजी मोटर्सनं एकापेक्षा एक सरस कार्स सादर केल्या आहेत.

Auto Expo 2023 : एमजीनं उतरवल्या एका पेक्षा एक सरस इलेक्ट्रीक कार्स, फोटो पाहून म्हणाल व्हॉव…
एमजी मोटर्सने (MG Motors) ऑटो एक्सपो 2023 च्या पहिल्या दिवशी त्यांच्या लोकप्रिय SUV Hector चे फेसलिफ्ट आणि हेक्टर प्लस मॉडेल लाँच केले. या कारची किंमत 14.73 लाख रुपयांपासून पुढे आहे. मात्र, एमजीच्या पॅव्हेलियनमध्ये अनेक कार्स लाँच करण्यात आल्या आहेत. MG ने ऑटो एक्सपोमध्ये आपल्या अनेक सर्वोत्तम कार्स लाँच केल्या. या लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच केल्या जाऊ शकतात. MG ने लाँच केलेल्या काही जबरदस्त इलेक्ट्रीक कार्सवर एक नजर टाकूया.
ऑटो एक्सपो 2023 च्या पहिल्याच दिवशी (11 जानेवारी) MG मोटरने मोठा धमाका केला. एमजी मोटर्सने खुलासा केला की ते भारतीय बाजारपेठेसाठी eRX5, MG6, MIFA9, Marvel R electric, MGS, MG4 यासह अनेक इलेक्ट्रीक कार्सचा विचार करत आहेत. कंपनीने या कार्स शोकेस केल्या.
11 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्सपो 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. पहिले दोन दिवस - 11 जानेवारी आणि 12 जानेवारी - माध्यमांसाठी राखीव असतील. मात्र, हे एक्सपो 14 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत सर्वसामान्यांसाठी खुले असेल.