शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Auto Expo 2020 : ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 09:13 IST

Auto Expo 2020 : बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत.

ठळक मुद्देAuto Expo 2020 बुधवारपासून सुरू झाला आहे. मारुतीसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार लाँच, प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. हा एक्स्पो या कंपन्यांसाठी महत्वाचा आहे. बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत.

Auto Expo 2020 बुधवारपासून सुरू झाला आहे. मारुतीसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार लाँच, प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. हा एक्स्पो या कंपन्यांसाठी महत्वाचा आहे. कारण भारतात वाहन उद्योग बदलाच्या लाटांवर स्वार झाला आहे. यातच काही चीनच्या कंपन्याही भारतात उतरणार आहेत. 150 किमींचा अजस्त्र डोलारा असलेल्या ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीने ऑटो एक्स्पोमध्ये एसयुव्ही आणि इलेक्ट्रीक कारच्या रेंजचे प्रदर्शन केले. 

बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. अशावेळी एकच पर्याय समोर दिसत आहे. तो म्हणजे इलेक्ट्रीक वाहनांचा. सरकारनेही याचा पिच्छा पुरविला आहे. मात्र, सध्याच्या कारच्या किंमती पाहता या कार सामान्यांपासून कोसो दूरच आहेत. पण चीनची सर्वात मोठी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स यंदा इलेक्ट्रीक कार Ora R1 भारतात लाँच करणार आहे. ही कार एका चार्जिंगमध्ये तब्बल 351 किमीचे अंतर तोडणार आहे. तर या कारचा सर्वाधिक वेग 100 किमी प्रती तास असणार आहे. ओरा आर1 मध्ये 35 किलो वॉटची मोटार देण्यात आली आहे. भारतीय बाजारात ही कार 6.23 लाख ते ८ लाख रुपयांमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच यावर सरकारकडून सबसिडीही मिळण्याची शक्यता आहे. 

बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार

भारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणारतर,  Great Wall Motors ने Haval हा एसयुव्ही ब्रँड भारतीय बाजारात आणण्याचे ठरविले आहे. याच्या काही एसयुव्ही मॉडेल ऑटो एक्स्पोमध्ये दाखविण्यात आल्या. हॅवल एफ७, हॅवल एफ७एक्स, हॅवल एफ५, हॅवल एच९, जीएमडब्ल्यू आयक्यू या गाड्या एक्स्पोमध्ये दाखविल्या. 

 

तळेगावमध्ये कंपनी स्थापन करणारग्रेट वॉल मोटर्स आणि जनरल मोटर्स यांनी १७ जानेवारी २०२० रोजी जनरल मोटर्स इंडियाच्या तळेगाव येथील कारखाना ताब्यात घेण्यासाठी करारनाम्यावर सह्या केल्या आहेत. या व्यवहारामुळे ग्रेट वॉल मोटर्सच्या भारतातील प्रवेशाचे नक्की झाले आहे. २०२०च्या दुसऱ्या सहामाहीत हा व्य़वहार पूर्ण होईल. ग्रेट वॉल मोटर्स या कारखान्यात ग्रेट वॉल अंतर्गत ईव्ही आणि एसयूव्ही मॉडेल्सचे उत्पादन सुरू करणार आहे. यामुळे या वर्षाच्या शेवटी यापैकी काही कार भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. 

Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार

टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही

बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू

मारुती तब्बल 17 कार दाखविणार; पेट्रोलवर 32 किमी धावणारी स्विफ्ट आणणार

 

टॅग्स :auto expoऑटो एक्स्पो 2020great wall motorsग्रेट वॉल मोटर्सchinaचीनAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग